Download App

नितेश राणे, पंकजा मुंडेंना मंत्रिपदासाठी फोन, भाजपकडून आणखी कोण घेणार शपथ? अन् कुणाचा पत्ता कट?

  • Written By: Last Updated:

Maharashtra Cabinet expansion : 5 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी (Prime Minister Modi) यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी पार पडला. त्यानंतर आज (15 डिसेंबर) नागपुरात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) नवनिर्वाचित आमदारांना मंत्रीपदासाठी फोन केल्याची माहिती आहे.

भारताला मिळणार 12 सुपर सुखोई, 13500 कोटींची डील फायनल, पाकिस्तान- चीनला चोख प्रत्युत्तर ! 

नवीन मंत्र्यांचा शपथविधी आज (15 डिसेंबर) पार पडणार आहे. आज संध्याकाळी 4 वाजता हा शपथविधी सोहळा होणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना फोन करण्यास सुरुवात केली. बावनकुळे यांनी नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, मंगलप्रभात लोढा, पंकज भोयर, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे यांना मंत्रीपदासाठी फोन केल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे वर्ध्याचे आमदार पंकज भोयर यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे. भाजपच्या संभाव्य मंत्रिपदाच्या यादीत आतापर्यंत पंकज भोयर यांचे नाव समोर आलं नाही. मात्र आज बावनकुळे यांनी पंकज भोयर यांना मंत्रीपदासाठी फोन केल्याचं समोर आलं.

नरहरी झिरवाळ, आदिती तटकरेंना मंत्रिपदासाठी पहिला फोन, राष्ट्रवादीकडून आणखी कोण घेणार शपथ? 

भाजपने 19 आमदारांना मंत्रीपदासाठी फोन केल्याची माहिती समोर येत आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे स्वत: फोन करत आहेत. त्यामुळं मुख्यमंत्र्यांसह भाजपचे 20 आमदार आज शपथ घेणार आहे. तर अजित पवारांचे 9 मंत्री आज शपथ घेणार आहेत. (अजितदादा धरून राष्ट्रवादीचे 10 मंत्री होणार) तर एकनाथ शिंदे यांचे 11 मंत्री आज शपथ घेणार आहेत. (एकनाथ शिंदेंना धरून शिवसेनेचे 12 मंत्री होतील)

भाजपकडून मंत्रिपदासाठी कोणाला फोन-
नितेश राणे
शिवेंद्रराज भोसले
चंद्रकांत पाटील
पंकज भोयर
मंगलप्रभात लोढा
गिरीश महाजन
जयकुमार रावल
पंकजा मुंडे
राधाकृष्ण विखे पाटील
गणेश नाईक
मेघना बोर्डीकर
जयकुमार गोरे

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नरहरी झिरवाळ आणि आदिती तटकरे यांना मंत्रिपदासाठी पहिला फोन केल्याचे वृत्त आहे. याशिवाय मंत्रिपदासाठी अनिल पाटील यांचे नावही निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे.

राष्ट्रवादीकडून कोणाला फोन-

दत्तात्रेय भरणे
मकरंद पाटील
छगन भुजबळ
हसन मुश्रीफ
इंद्रनील नाईक
धर्मराव बाबा आत्राम

तर शिवसेनेकडून उदय सामंत, दादा भुसे, शंभूराज देसाई आणि संजय शिरसाट यांची नावं निश्चित झाल्याचं बोलल्या जातंय.

शिवसेनेकडून कोणाला फोन –
भरत गोगावले
उदय सामंत
प्रताप सरनाईक
योगेश कदम
आशिष जैस्वाल
गुलाबराव पाटील

शंभूराज देसाई
प्रकाश आबिटकर
संजय राठोड

follow us