Maharashtra Cabinet Expansion : राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) आज सायंकाळी नागपुरात होणार आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यासाठी आज सकाळापासूनच भावी मंत्र्यांचे फोन खणखणू लागले आहेत. मंत्रिपदासाठी नावे निश्चित करताना काही माजी मंत्र्यांचा पत्ता कट झाला आहे. यात भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा पत्ता कट झाल्याची माहिती आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रवींद्र चव्हाण आणि सुधीर मुनगंटीवार या दोन माजी मंत्र्यांची नावं यंदा नाहीत. सुधीर मुनगंटीवार यांच्या ऐवजी वर्ध्याचे आमदार पंकज भोयर यांना मंत्रिपदी संधी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. मंत्रिपदासाठी पंकज भोयर यांना फोन करण्यात आल्याचीही माहिती मिळाली आहे. त्यामुळे महायुती सरकारमध्ये भोयर यांचं मंत्रिपद निश्चित मानलं जात आहे.
जळगावमध्ये ठरलं! भाजप, शिंदे अन् अजित पवार गटाच्या ‘या’ तिघांचं मंत्रिपद फिक्स
मंत्रिमंडळाचा विस्तार आज सायंकाळी नागपुरात होणार आहे. या सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. ज्या आमदारांना शपथ द्यायची आहे त्यांना फोन केले जात आहेत. तर दुसरीकडे भावी मंत्र्यांची यादीही समोर आली आहे. भाजपाचा विचार केला तर या यादीतही भाजपने धक्कातंत्र वापरल्याचे दिसत आहे. यादीत माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि रवींद्र चव्हाण या दोन दिग्गज माजी मंत्र्यांची नावं नाहीत.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये सुधीर मुनगंटीवार वनखात्याचे मंत्री होते. सांस्कृतिक कार्य विभागाचीही जबाबदारी त्यांच्यावर होती. लोकसभा निवडणुकीतही पक्षाने त्यांना तिकीट दिलं होतं. लोकसभेत जाण्याची आपली इच्छा नाही असे मुनगंटीवार यांनी बोलूनही दाखवले होते. मात्र पक्षाचा आदेश असल्याने नाईलाजाने आणि नाराजीतच त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.
विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांनी या पराभवाचा वचपा काढला. मुनगंटीवार आमदार झाले. त्यामुळे राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांना पुन्हा संधी मिळेल अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. परंतु, यादीला विलंब झाला. याचाच अर्थ मंत्रिमंडळाची यादी तयार करताना उलटफेर होणार याचे संकेत आहेत. पक्षांतर्गत विरोधकांना डावलण्यात येणार आणि समर्थकांची वर्णी लावण्याची ही खेळी आहे असे भाजपाच्याच पश्चिम विदर्भातील नेत्याने सांगितले होते.
रविवारी सकाळी भाजपाच्या गोटातून जी संभाव्य उमेदवारांची नावं जाहीर झाली त्यात सुधीर मुनगंटीवार यांचं नाव नव्हतं. तसेच रवींद्र चव्हाण यांचेही नाव नव्हते. त्यांच्या ऐवजी मंत्रिपदासाठी पंकज भोयर यांना फोन करण्यात आल्याचीही माहिती मिळाली आहे. त्यामुळे महायुती सरकारमध्ये भोयर यांचं मंत्रिपद निश्चित मानलं जात आहे.
नितेश राणे, पंकजा मुंडेंना मंत्रिपदासाठी फोन, भाजपकडून आणखी कोण घेणार शपथ? अन् कुणाचा पत्ता कट?
संभाव्य मंत्रिपदाच्या यादीत डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांचंही नाव नाही. शिंदे सरकारच्या काळात चव्हाण बांधकाम खात्याचे मंत्री होते. त्यामुळे यंदाही त्यांना संधी मिळेल अशी शक्यता होती. पक्षांतर्गत होणारे वाद मिटवण्यात चव्हाण यांची भूमिका असते. मध्यंतरी आमदार निलेश राणे यांच्या नाराजीवरही रवींद्र चव्हाण यांनीच मध्यस्थी केली होती. त्यामुळे त्यांची उपयुक्तता लक्षात घेऊन मंत्रिमंडळात पुन्हा संधी मिळेल अशी शक्यता होती. परंतु, यादीत नाव नसल्याने पक्षाने त्यांच्याबाबतीत वेगळा विचार केल्याचे संकेत मिळाले आहेत.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे विजयी झाले आहेत. मंत्रिमंडळातही बावनकुळेंना संधी मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे आता त्यांना प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यांच्या जागी भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांनी नियुक्ती मिळणार असल्याची दाट शक्यता आहे.
भाजप
देवेंद्र फडणवीस
चंद्रशेखर बावनकुळे
नितेश राणे
शिवेंद्रराजे भोसले
चंद्रकांत पाटील
पंकज भोयर
मंगलप्रभात लोढा
गिरीश महाजन
जयकुमार रावल
पंकजा मुंडे
राधाकृष्ण विखे पाटील
गणेश नाईक
मेघना बोर्डीकर
माधुरी मिसाळ
अतुल सावे
आकाश फुंडकर
अशोक उईके
जयकुमार मोरे
संजय सावकारे
आशिष शेलार
अजित पवार गट
दत्तात्रय भरणे
मकरंद पाटील
छगन भुजबळ
हसन मुश्रीफ
इंद्रनील नाईक
धर्मराव बाबा आत्राम
एकनाथ शिंदे गट
उदय सामंत
शंभुराजे देसाई
गुलाबराव पाटील
दादा भुसे
संजय राठोड
संजय शिरसाट
भरत गोगावले
प्रकाश अबिटकर
योगेश कदम
आशिष जैस्वाल
प्रताप सरनाईक