.. म्हणून पवारांना आम्ही घाबरतो; गुलाबरावांनी सांगितले भन्नाट कारण, वाचा..

Gulabrao Patil News : राज्य सरकारचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) सध्या त्यांच्या वक्तव्यांमुळे चांगलेच चर्चेत आहेत. मंत्रिपदाचा सट्टा लावून एकनाथ शिंदेंबरोबर गेल्याच्या त्यांच्या वक्तव्याने राजकारणात चांगलाच गदारोळ उडाला होता. त्यानंतर आता त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबत एक मजेशीर वक्तव्य केले आहे. ‘पवारांसारखी […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (83)

Gulabrao Patil

Gulabrao Patil News : राज्य सरकारचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) सध्या त्यांच्या वक्तव्यांमुळे चांगलेच चर्चेत आहेत. मंत्रिपदाचा सट्टा लावून एकनाथ शिंदेंबरोबर गेल्याच्या त्यांच्या वक्तव्याने राजकारणात चांगलाच गदारोळ उडाला होता. त्यानंतर आता त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबत एक मजेशीर वक्तव्य केले आहे. ‘पवारांसारखी बुद्धी कुणाचीही चालत नाही. त्यामुळे आम्ही त्यांना घाबरून असतो,’ असा चिमटा त्यांनी शरद पवार व अजित पवार यांना काढला.

शिंदे-फडणवीस तुम्हीच आमच्याकडे या; शेतकऱ्यांच्या इशाऱ्यानंतर लाँग मार्चमध्ये नवा ट्विस्ट !

जळगाव जिल्ह्यातील एक विवाह सोहळ्याला मंत्री पाटील उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी आपल्या खास शैलीत टोलेबाजी केली. त्यांच हा व्हिडीओ सुद्धा चांगलाच व्हायरल होत आहे. वधूचे माहेरचे आडनाव पवार होते. हे लक्षात येताच ते म्हणाले, की ‘पवारांसारखी बुद्धी कुणाचीच चालत नाही. त्यामुळे आम्ही त्यांना घाबरून असतो. ते सकाळी-सकाळी कधी शपथ घेतील आणि काय करून टाकतील याचा नेम नसतो. त्यांच्या बुद्धीपुढे कुणाचेही चालत नाही. त्यामुळे त्यांना नेहमी सोबत ठेवतो,’ असे त्यांनी म्हणताच तेथे उपस्थितांत जोरदार हास्यकल्लोळ उडाला.

.. म्हणून पवारांना आम्ही घाबरतो; गुलाबरावांनी सांगितले भन्नाट कारण, वाचा..

मंत्री पाटील यांनी याआधीही आम्ही मंत्रिपदाचा सट्टा लावून एकनाथ शिंदेंच्या मागे गेलो होतो, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरूनही चांगलाच गदारोळ उडाला होता. त्यांच्यावर टीकाही झाली होती. नागालँडमध्ये राष्ट्रवादीने तेथील मुख्यमंत्र्यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावरही त्यांनी जोरदार टीका केली होती. तसेच विधिमंडळातही ते त्यांच्या आक्रमक वक्तव्यामुळे कायमच  चर्चेत असतात. आता त्यांनी केलेल्या वक्तव्यावर अद्याप विरोधी गटाकडून प्रतिक्रिया आलेल्या नाहीत.

Exit mobile version