Download App

महायुतीत ‘मनसे’ची एन्ट्री? जागावाटपाचा फॉर्म्युला तयार, भाजप-शिवसेनेचं गणित काय?

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर (Lok Sabha Election 2024) राज्यात महाविकास आघाडीची शकले होत असताना महायुतीत ‘फिलगुड’ वातावरण आहे. महायुतीत आणखी एक नव्या ‘मित्रा’ची एन्ट्री होण्याची दाट शक्यता दिसत आहे. निवडणुकीत मनसेला दोन जागांची चर्चा, मनसे आणि भाजप नेत्यांच्या गाठीभेटी, भाजप नेत्यांकडून मनसेच्या नेत्यांना आग्रहाचं आमंत्रण, भाजपच्या कार्यक्रमांना मनसे नेत्यांची हजेरी.. या सगळ्या गोष्टी भविष्यातील युतीचेच संकेत देत आहेत. जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आलेल्या असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मनसेला एक ते दोन जागा सोडण्यासाठी भाजप आणि शिवसेना तयार असल्याची माहिती मिळाली आहे.

Lok Sabha 2024 : मनसे-भाजप युती फिक्स? राज ठाकरेंच्या शिलेदारानं सांगितली ‘खास बात’

मनसेने जर महायुतीसोबत निवडणूक लढली नाही तर त्यांना राज्यसभेचा पर्याय असेल. महायुतीच्या चिन्हावर निवडणूक लढा असा प्रस्ताव मनसेला देण्यात आला आहे. पण मनसेने हा प्रस्ताव नाकारला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुती आणि मनसेत चर्चा सुरू आहे. राज ठाकरे यांनी सध्या त्यांचे सगळे दौरे रद्द केले आहेत. या चर्चा जर सफल झाल्या तर मनसे थोड्याच दिवसात महायुतीत दिसेल.

मनसेसाठी भाजप आणि शिवसेना एक ते दोन जागा सोडण्यास तयार आहेत. भाजप मनसेसाठी दक्षिण मुंबईची जागा सोडू शकतो अशी चर्चा आहे. हा मतदारसंघ मराठी बहुल आहे. परळ, लालबाग, काळाचौकी, गिरगाव, वरळी हा भाग या मतदारसंघात येतो. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा उद्धव ठाकरे गटाची ताकद येथे जास्त आहे. या मतदारसंघात भाजपाचे दोन आमदार आहेत. अशा परिस्थितीत जागावाटपात ही जागा भाजपकडे येऊ शकते.

मोठी बातमी : ‘फायरब्रॅंड’ नेते वसंत मोरेंचा राजीनामा; साहेब माफ करा म्हणत मनसेला ‘जय महाराष्ट्र‘ 

दरम्यान, मनसेचे आमदार, नगरसेवक नसले तरी त्यांचा एक निश्चित मतदार आहे. त्यांना डावलून निवडणूक अटीतटीची करण्यापेक्षा मनसेला सोबत घेण्यात भाजपाचा जास्त फायदा आहे. तसेच राज ठाकरे प्रचारात उतरले तर महायुतीच्या प्रचाराला वेगळीच धार येईल, असे गणित भाजप नेत्यांच्या डोक्यात आहे. आता हे गणित सुटून मनसे महायुतीत येणार का, हे थोड्याच दिवसात स्पष्ट होईल.

follow us