Maharashtra Monsoon Session : शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी साईबाबा, महात्मा फुले, महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त विधाने केली आहेत. त्यावरून सत्ताधारी व विरोधक हे एकमेंकावर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. याचे पडसाद आज विधानसभा आणि विधिमंडळातही उमटले आहेत. भिडे यांना भिडे गुरुजी म्हणण्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) व काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण (Prithiraj Chavan) यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली. त्यात दोघांना गुरुजी, बाबा नाव वापरण्यावरून थेट पुरावेच मागितले आहे. (Maharashtra Monsoon Session devendra fadanvis vs prithiraj chavan over sambhaji bhide hate speach)
गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेले धार्मिक तणाव, संभाजी भिडे यांच्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले आहे. त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत धार्मिक तणाव निर्माण करणाऱ्यांविरोधात सरकार कारवाई करेल. महापुरुषांच्या अपमान करणाऱ्यांनाही सरकार सोडणार नाही, असे उत्तर दिले.
मनोहर भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करा, अमोल मिटकरीं आक्रमक
त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांना भिडणारा प्रश्न उपस्थित केला. तुम्ही एकीकडे अॅड. प्रकाश आंबेडकर यांना कुणाचे महिमामंडन कोणी करू नये, असे सांगता. संभाजी भिडे हे फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक होते, असे तो सांगतो. त्या माणसाची संस्था रजिस्टर आहे का? त्याचा अहवाल आहे का ? तो बहुजन तरुणांकडून सोने जमा करतो. हा महिमामंडन नाही का ? त्यांना गुरुजी म्हणता, त्याचा पुरावा आहे का असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
महापुरुषांचा अपमान करण्याचे लायसन्स भाजपाने संभाजी भिडेंना दिले आहे का ? पटोलेंचा थेट सवाल
तुमचे नाव पृथ्वीराज बाबा आहे. बाबा नाव कसे याचा पुरावा मागू का ?
त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही पृथ्वीराज चव्हाण यांनाच घेरले. त्यांचे नावच भिडे गुरुजीच आहे. तुमचे नाव पृथ्वीराज बाबा आहे. बाबा कसे याचा पुरावा मागू का ? असा सवाल फडणवीस यांनी केला. विरोधक हे केवळ मतांचे राजकारण करत आहे. महापुरुषांचा अवमान आम्ही सहन करणार नाही, असे सांगत फडणवीस यांनी माझा सख्या भाऊ जरी असला तरी कारवाई करील, असे फडणवीस यांनी ठासून सांगितले.