मनोहर भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करा, अमोल मिटकरीं आक्रमक
शिवप्रतिष्ठान हिंदु्स्तान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून सुरू असलेला गदारोळ अजूनही शांत झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी आज पत्रकार परिषदेत बोलताना आक्रमक झाले. यावेळी अमोल मिटकरींनी संभाजी भिडेंच्या अटकेची मागणी करत राज्य सरकारला घरचा आहेर दिला. (maharashtra mumbai NCP leader Amol Mitkari warning to government on sambhaji bhides controversy)
यावेळी मिटकरी म्हणाले आज विरिष्ट सभागृहात काँग्रेस चे नेते भाई जगताप यांनी मनोहर भिडे यांच्या बाबत प्रश्न उपस्थित केला. यामध्ये मीदेखील सहभागी झालो काही गोष्टींची तत्वाशी आम्ही कायम एकनिष्ठत आहोत. जरी आम्ही रस्ता बदलला असला तरी आमचे तत्व बदलले नाही. देशाच्या महापुरुषांचा अपमान आम्ही कधीच खपून घेणार नाही. त्यामुळे मनोहर भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी.
पुढे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलताना मिटकरी म्हणतात वरच्या सभागृहात देवेंद्रजी बोलल्या नंतर मी आक्षेप घेतला. त्यांनी भिडेंना गुरू मानलं असेल तर तो त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे. परंतु सरकारने भिडे यांचावर गुन्हा दाखल न करता तो जिथे असेल तिथून त्याला लवकरात लवकर उचलून अटक केली पाहिजे.
Nitin Desai : एन.डी. स्टुडिओ उभारण्यास कारण ठरला होता हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पीट…
आंदोलनाबाबत बोलताना मिटकरी म्हणतात इथे सत्ता असणं, नसणं याचा संबंध नाही. महापुरुषांचे अपमान होणार असेल तर विरोध केलाच पाहिजे. भिडे याची वक्तव्यं जाणूनबुजून येत आहेत. राजाश्रय देऊ नये लवकर भिडेला अटक करावे नाहीतर सत्ता पक्षात असून देखील आंदोलनाचा इशारा यावेळी अमोल निरंकारी यांनी दिला
काल म्हणजे 1 ऑगस्टला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी टिळक पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुण्यात आले होते. या कार्यक्रमानिमित्त नरेंद्र मोदी, शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर होते. यावेळी शरद पवार आणि अजित पवार यांचा सामना झाला नाही कारण अजित पवार यांनी शरद पवार यांचा मान ठेवला… त्यांच्या समोरून न जाता मागून गेले.