Maharashtra Monsoon Session : महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. विविध मुद्द्यांवरुन शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकार आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून हे पावसाळी अधिवेशन लवकरच गुंडाळणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. आता मात्र पावसाळी अधिवेशन 4 ऑगस्टपर्यंत सुरु राहणार असल्याचे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले आहे. विधिमंडळ सल्लागार समितीने याबाबत निर्णय घेतला आहे.(Maharashtra Monsoon Session will continue till August 4 Legislative Advisory Committee Neelam Gorhe)
MIDC : रोहित पवारांचा दबाव, राम शिंदेंचा आग्रह… पण उदय सामंत शेवटपर्यंत बधलेच नाहीत!
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून सुरु झाले आहे. हा अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीमध्ये सुरु असलेले अधिवेशन लवकरच गुंडाळले जाणार असल्याची चर्चा आज सकाळपासूनच सुरु झाली होती. काही आमदारांनी तशी मागणीही केली होती.
सर्वसामान्यांना दिलासा! महात्मा फुले जन आरोग्य योजनेत ‘या’ आजारांचा समावेश करणार
भाजपचे आमदार संजय कुटे यांनी तर आपण तशी विनंती सभागृहात करणार असल्याचे माध्यमांना सांगितले. मात्र विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. पावसाळी अधिवेशन हे ठरल्याप्रमाणे 4 ऑगस्टपर्यंत चालणार असल्याचे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
आज मुंबई येथील विधानभवनामध्ये कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी उपसभापती डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज 4 जुलैपर्यंत सुरु राहणार आहे.
दरम्यान, मुंबई येथील आझाद मैदानात गिरणी कामगारांचे आंदोलन सुरु आहे. त्याबाबत विधिमंडळात बैठक आयोजित करण्यात यावी, अशी सूचना डॉ. गोऱ्हे यांनी बैठकीत केली.
या बैठकीला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, आमदार प्रवीण दरेकर, सतीश चव्हाण, विजय ऊर्फ भाई गिरकर, प्रसाद लाड, एकनाथ खडसे, अनिल परब, सतेज ऊर्फ बंटी पाटील, अशोक ऊर्फ भाई जगताप, शशिकांत शिंदे, प्रसाद लाड, कपिल पाटील, विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे, सचिव 2 विलास आठवले, उपसचिव ऋतुराज कुडतरकर, अवर सचिव पुष्पा दळवी आदी उपस्थित होते.