Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Retirement) यांनी त्यांच्या लोक माझा सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावी,अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते करत आहेत.
शरद पवारांच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली. मात्र, अजित पवार यांनी घेतलेल्या वेगळ्या भूमिकेवर बोलणेच टाळले.
Sharad Pawar Retirement : पवार राजीनामा देणार ‘हे’ अजित पवारांना आधीच माहित होतं, म्हणाले…
या निर्णयावर प्रतिक्रिया देताना देशमुख म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर शरद पवार हेच राहिले पाहिजेत. तशी विनंती आम्ही त्यांना केली आहे. पुन्हा करणार आहोत.देशाला आणि राज्याला आज पवार साहेबांची गरज आहे, असे देशमुख म्हणाले.
यानंतर प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींनी त्यांना अजित पवार यांनी घेतलेल्या वेगळ्या भूमिकेबाबत प्रश्न विचारला. त्यावर मात्र अनिल देशमुख यांनी बोलणेच नाकारले. त्यानंतर पत्रकारांनाही त्यांचा मूड ओळखून त्यांना पुढील प्रश्न विचारला.
Ajit Pawar राष्ट्रवादीचे नेतृत्व करण्यास सज्ज! पवारांसमोरच अनेकांना झापले…
काय म्हणाले अजितदादा ?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा राजीनामा आता कार्यकर्त्यांनी स्वीकारावा असाच आग्रह धरणारे त्यांचे भाषण होते. त्यांच्या डोळ्यादेखत पक्षाचा नवीन अध्यक्ष तयार होईल, अशी रोखठोक भूमिका अजितदादांनी मांडली. हे कधी ना कधी होणारच होते, असे ते म्हणाले होते.
दरम्यान, पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. ‘देश का नेता कैसा हो शरद पवार जैसा हो’, ‘महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार’ अशा घोषणांनी यशवंतराव चव्हाण सेंटर परिसर दुमदुमून गेला आहे. यानंतर अनेकांना अश्रू अनावर झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवळ यांना अश्रू अनावर झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील भावूक झालेले पहायला मिळाले आहेत. यानंतर सर्व कार्यकर्ते शरद पवारांची समजूत घालण्यासाठी व्यासपीठावर दाखल झालेले आहेत. त्यांच्या या निर्णयानंतर अजितदादांनी सर्व कार्यकर्त्यांची समजूत घातली आहे.