Sharad Pawar Retirement : पवार राजीनामा देणार ‘हे’ अजित पवारांना आधीच माहित होतं, म्हणाले…

  • Written By: Published:
Sharad Pawar Retirement : पवार राजीनामा देणार ‘हे’ अजित पवारांना आधीच माहित होतं, म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या लोक माझा सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कार्यकर्ते जसे स्तब्ध झाले आहेत तसेच पक्षातील नेतेही स्तब्ध झाले आहेत.

त्यावर अनेक लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मात्र इतर नेत्यांपेक्षा वेगळं मत मांडलं. यावेळी अजित पवार म्हणाले की खरंतर ते कालच राजीनामा देणार होते. पण काल महाविकास आघाडीची सभा होती. मीडियामध्ये तेच येत राहिले असत म्हणून कालच्या ऐवजी आज राजीनामा देण्याचा राजीनामा ठरला. अशी माहिती अजित पवार यांनी दिली

साहेब राजीनामा मागे घेणार नाहीत.

पण त्यामुळे शरद पवार राजीनामा देणार हे अजित पवार यांना आधीच माहित होत, याची चर्चा रंगली आहे. दरम्यान सगळे कायकर्ते भावूक होऊन शरद पवारांना निर्णय मागे घेण्याची विनंती करत होते. पण, फक्त एकमेव अजित पवारांनी निणर्याला पाठिंबा दिला. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की काकींनी (प्रतिभा पवार) मला सांगितलय. साहेब राजीनामा मागे घेणार नाहीत. आपण सर्वजण त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहोत.  साहेब असतीलच तर अल्पसंख्यांकाना न्याय मिळतील, असे म्हणणे चुकीचे आहे. साहेबांच्या नेतृत्वाखालीच आणि मार्गदर्शनानुसार नवीन अध्यक्ष काम करील.

ते पुढे म्हणाले की काळानुरूप काही निर्णय घ्यावे लागतात. उद्या नवीन अध्यक्ष झाल्यानंतर साहेब राजकारणातील त्याला बारकावे सांगतील. साहेबांच्या नजरेसमोर नवीन अध्यक्ष झाला तर तुम्हाला का नको रे, असा सवाल विचारत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना अश्रू ढाळण्याचे कारण नाही. हा प्रसंग कधी ना कधी येणार होता. रडारड करण्याचे कारण नाही. साहेबांनी निर्णय घेतला आहे. त्यांच्या मनात आहेत त्याच गोष्टी होतील.

सुप्रियाला म्हणाले बोलू नको…

शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या जवळपास सर्व नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्वानी आपला राजीनामा मागे घ्यायची विंनती केली. त्यावेळी जेव्हा काही नेत्यांनी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना बोलण्याची विंनती केली तेव्हा आमही घरातून बोलू शकत नाही. असं अजित पवार म्हणाले पण त्यानंतर मात्र अजित पवार यांनी स्वतः मनोगत व्यक्त केलं. पण सुप्रिया सुळे यांना मात्र मोठा भाऊ म्हणून सांगतो. बोलू नको, असं सांगितलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube