Cabinate Ministers NCP Name List Ajit Pawar Dhananjay Munde : सध्या राज्यात सत्तास्थापनेच्या घडामोडी सुरू आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नाव अद्याप निश्चित झाले नसले, तरी शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला होणार हे निश्चित आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे पुढील मुख्यमंत्री असतील आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांना उपमुख्यमंत्री केले जाईल, अशी शक्यता वर्तवली जात (New Cabinate Ministers) आहे. दरम्यान, अजित पवार यांच्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्रिमंडळात समाविष्ट होणाऱ्या नेत्यांची संभाव्य नावे समोर आली आहेत.
शिंदे अलर्ट मोडवर, पवार दिल्लीला तर शाह चंदिगढला रवाना; महायुतीत नेमकं चाललंय काय?
एबीपी माझ्या या वृ्त्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार महायुतीच्या नव्या सरकारमध्ये (Maharashtra New Cabinate Ministers) अजित पवार गटातील 10 ते 11 नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. त्यात छगन भुजबळ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे या नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव जरी निश्चित झाले नसले, तरी शपथविधीची तारीख मात्र निश्चित झाली आहे. महाराष्ट्रात गुरुवारी (5 डिसेंबर) शपथविधी सोहळा होणार आहे. याबाबत महायुतीचे नेते मंगळवारी दुपारपर्यंत आझाद मैदानात पाहणीसाठी जाणार आहेत. पंतप्रधान मोदींशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि एनडीएचे प्रमुख नेते आणि भाजपशासित राज्यांचे सर्व मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की… शपथविधीसाठी देवेंद्र फडणवीसांचा कोट शिवून तयार
मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्रीपदासह अर्थमंत्रालयाची जबाबदारी देखील अजित पवारांना मिळण्याची शक्यता आहे. तर नगरविकास, सार्वजनिक बांधकाम विभाग अशी मोठी मंत्रिपदे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाकडे जाऊ शकतात. अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटात पीडब्ल्यूडी, नगरविकास, अर्थमंत्रालय यावरून वाद सुरू असल्याची देखील माहिती मिळतेय. दोन्ही पक्षांना हे मंत्रिपद हवं आहे. दरम्यान, अजित पवार दिल्लीत आहेत. आपल्या पसंतीच्या मंत्रिपदांबाबत ते भाजप हायकमांडशी बोलू शकतात, अशी शक्यता वर्तवली जातेय.
राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची नावे :
अजित पवार
अदिती तटकरे
छगन भुजबळ
दत्ता भरणे
धनंजय मुंडे
अनिल भाईदास पाटील
नरहरी झिरवळ
संजय बनसोडे
इंद्रनील नाईक
संग्राम जगताप
सुनील शेळके