Anna Hajare News :ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्यात लोकायु्क्त विधेयकासाठी मोठे प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांनंतरच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना विधेयक विधानसभेत पारित करण्यात आले. त्यानंतर विधानपरिषदेत मात्र मंजूर होऊ शकले नाही. पुढे सरकार बदलेले आणि साऱ्याच हालचाली थांबल्या. आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अण्णांची भेट घेतल्यानंतर पुन्हा लोकायुक्ताच्या चर्चांनी उचल खाल्ली आहे. या भेटीत अण्णांनीही सरकारला निर्वाणीचा इशारा दिल्याचे समजते.
राज्य सरकारने वेळाकाढूपणा करू नये. आगामी हिवाळी अधिवेशनात विधानपरिषदेत कायद्याला मंजुरी द्यावी. अन्यथा माझा आंदोलनाचा मार्ग मोकळा आहे, असा इशारा अण्णांनी दिला. सरकारच्या काही अडचणी असू शकतात त्यामुळे त्यांना वेळ दिला आहे, असेही हजारे यांनी स्पष्ट केले.
लोकपाल विधेयक कधी मंजूर होणार? अण्णा हजारेंच्या भेटीनंतर मंत्री विखेंनी सांगितली डेडलाईन
महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक हे विधानसभेत मंजूर झालेले आहे मात्र ते विधानपरिषदेत मंजूर होऊ शकले नाही. मात्र आता हिवाळी अधिवेशनात विधानपरिषदेत विधेयक सादर करण्यात येईल व कोणत्याही अडचणी नसतील ते मंजूर देखील होईल. असे आश्वासन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी अण्णा हजारे यांना प्रत्यक्ष भेटून दिले.
शासन आपल्या दारी या योजनेची माहिती देण्यासाठी मंत्री विखे हे नगरमध्ये आले होते. त्यांनतर राळेगणसिद्धीमध्ये अण्णा हजारे यांच्या भेटीसाठी गेले. यावेळी लोकायुक्त विधयेकावर चर्चा झाली. लोकायुक्त विधेयक हे फडणवीस सरकार यांच्या काळात विधानसभेत मंजूर झाले आहे. मात्र विधानपरिषदेत हे विधयेक मंजूर करण्यास काय अडचणी येत आहे याबाबत मंत्री विखे यांनी अण्णांशी चर्चा केली. तसेच येत्या हिवाळी अधिवेशनात सरकार हे विधेयक विधानपरिषदेत मंजुरीसाठी आणेल, असे देखील विखे यांनी स्पष्ट केले.
‘मग, अडवाणींना राष्ट्रपती होण्यापासून मोदींनी रोखले का?’ PM मोदींच्या टीकेवर राऊतांचा थेट सवाल
लोकायुक्त विधेयक हे विधानसभेत मंजूर झाले आहे मात्र विधानपरिषदेत ते मंजूर झाले नाही आहे. सरकारला यासाठी अडचणी येत आहे. सध्या विधानपरिषदेमध्ये बहुमत नसल्याने हे विधयेक मंजूर होण्यास विलंब होत आहे, अशी माहिती अण्णा हजारे यांनी दिली आहे.