Download App

राहुल नार्वेकर करणार तरी काय? झिरवळांनी दिलं खोचक उत्तर

Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) निकाल देत आमदारांच्या अपात्रतेचा चेंडू सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात ढकलला. अध्यक्षांनी याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असेही न्यायालयाने म्हटले होते. मात्र, अध्यक्षांनी अजूनही निर्णय घेतलेला नाही. यानंतर ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने याच मागणीसाठी दोन दिवसांपूर्वी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची भेट घेतली होती. या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा झाली होती. आता विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Jhirwal) यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

राहुल नार्वेकर हे भाजप आमदार आहेत. ते पक्षांतर करून भाजपात आले आहेत. त्यामुळे नार्वेकरांना पक्षांतराचे वावडे नसेल. त्यांच्याकडून न्याय्य निकाल येणार नाही, असा दावा विरोधक करत आहेत. न्यायालयाने दिलेल्या चौकटीत योग्य त्या प्रक्रियांचा अवलंब करूनच आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेतला जाईल, असे नार्वेकर म्हणाले आहेत.

Maharashtra Politics : “कुत्रा, मांजर, खोके, बोके” : सकाळच्या राड्यावरुन संभाजीराजे छत्रपती भडकले

झिरवळ यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणले, तपासण्या करण्यापलीकडे त्यांच्या हातात काहीच नाही. कितीही दिवस तपासत राहिले तरी शेवटी तपास ठरलेलाच आहे. न्यायालयाने दहा ते बारा त्रुटी स्पष्ट केल्या आहेत. या सगळ्या विरोधात आहेत. फक्त एकच शिल्लक राहिले आहे ते तपासणी करण्यासाठी नार्वेकरांकडे दिले आहे. तपास कधीपर्यंत चालेल याची काहीच खात्री नाही. लवकरात लवकर ही राजकीय व्यासपीठावरील किंवा सभागृहातील भाषा आहे. लवकरात लवकर आपल्याला कधीही म्हणता येईल. अगदी सहा महिन्यांनंतरही लवकरच असते, असा खोचक टोला झिरवळांनी लगावला.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालायने यावर निकाल देऊनही आता बरेच दिवस झाले आहेत. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालीही सरकारने सुरू केल्या आहेत. तरी देखील आमदारांच्या अपात्रतेवर अध्यक्षांनी निर्णय घेतलेला नाही.  यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. मात्र या मुद्द्यावर सरकार फार विचार करत नसल्याचे दिसत आहे. अध्यक्ष भाजपचेच आमदार असल्याने त्यांच्याकडून न्याय मिळेल याची शाश्वती विरोधी पक्षांना नाही. तरी देखील विधानसभेचे अध्यक्ष यावर काय निर्णय देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

बच्चू कडूंचा अमरावती लोकसभेवर दावा! राणा म्हणाले, दावे खोडण्याची आमच्यात ताकद

 

Tags

follow us