बच्चू कडूंचा अमरावती लोकसभेवर दावा! राणा म्हणाले, दावे खोडण्याची आमच्यात ताकद

बच्चू कडूंचा अमरावती लोकसभेवर दावा! राणा म्हणाले, दावे खोडण्याची आमच्यात ताकद

Bacchu Kadu claims Amravati Lok Sabha Seat : प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर दावा ठोकला आहे. त्यांच्या या पवित्र्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिंदे गट आणि भाजप यांचे जागावाटप अजून ठरलेले नाही. जागावाटप ही जागा कुणाकडे जाईल याबाबतही काहीच निश्चित नाही. मात्र, त्याआधीच दबावाचे राजकारण खेळत कडू यांनी हा डाव टाकला आहे.

कडू यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कडू म्हणाले, आमची तयारी पूर्ण झाली आहे. याआधी मी लोकसभा निवडणूक लढली होती त्यावेळी फक्त पाच हजार मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे आता पुन्हा आम्ही तयारी सुरू केली आहे. आमच्याकडे चांगला उमेदवार सुद्धा आहे. भाजप-शिंदे गटात जागा कुणाला सुटणार हे अजून निश्चित नाही पण मागणी करणं तर चुकीचं नाही ना. मागणी तर करायलाच पाहिजे नंतर पुढे पाहू काय होतंय ते, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

Nana Patole यांची उचलबांगडी निश्चित : काँग्रेसचे 2 ‘चाणक्य’ प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत

समोरची लढाई कशी लढायची ते पाहू

आमदार रवी राणा (Ravi Rana) म्हणाले होते, की बच्चू कडू दर आठवड्याला स्टेटमेंट बदलतात. आज जरी ते असे बोलत असतील तरी नवनीत राणा यांचा प्रचार करायला तेच येतील. भारतीय जनता पार्टीच्या आशिर्वादाने नवनीत राणा (Navneet Rana) याच निवडणूक लढणार. यावर प्रतिक्रिया देताना कडू म्हणाले, त्यांचा आशावाद बरोबर आहे. समोरील लढाई कशी लढायची ते पाहू.

विधानसभेच्या 15 जागा लढणार

विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही 15 जागांची तयारी करत आहोत. भुसावळ असेल जळगावमध्ये 2 जागा, नंदूरबार, सोलापूर, अमरावतीमध्ये 3 जागा, नागपूरमध्ये 1 जागा, अकोटमध्ये 2 जागा आणि वाशिम अशी 15 जागांची तयारी आपण करत आहोत, असे त्यांनी सांगितले.

मोदींना नाकारलं, 83 टक्के नागरिकांना वाटतं, संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करावं

दावे खोडण्याची राणात ताकद – रवी राणा

बच्चू कडूंच्या राजकीय खेळीवर बडनेराचे आमदार रवी राणा यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस आमच्या पाठीशी आहेत. त्यामुळे कोण कुठली जागा मागतोय आणि कुणाला कोणती जागा मिळणार याचा निर्णय नरेंद्र मोदी, अमित शाह आणि फडणवीस घेतील. कोणी कितीही दावे केले तरी ते खोडून काढण्याची ताकद रवी राणामध्ये आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube