Maharashtra Politics : “कुत्रा, मांजर, खोके, बोके” : सकाळच्या राड्यावरुन संभाजीराजे छत्रपती भडकले

Maharashtra Politics : “कुत्रा, मांजर, खोके, बोके” : सकाळच्या राड्यावरुन संभाजीराजे छत्रपती भडकले

Sambhajiraje Chhatrapati On Politician : संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी पुण्यातून ‘स्वराज्य’ संघटनेचे रणशिंग फुंकले आहे. पुण्यातील शिवाजीनगरला (Shivajinagar)स्वराज्य संघटनेच्या स्वराज्य भवन या मध्यवर्ती कार्यालयाचा लोकार्पण सोहळा शनिवारी पार पडला. यानंतर बालगंधर्व रंगमंदिर (Balagandharva Rangmandir)येथे स्वराज्य संघटनेचे पहिले अधिवेशनही पार पडले. या अधिवेशनामध्ये स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यातील राजकारण आणि राजकारण्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी संभाजीराजे म्हणाले की, राजकारणी एवढे माजलेले आहेत की, राजकारणाची पातळी किती खाली घातली आहे? सकाळी आपण टीव्हीवर काय पाहतो? रात्री आपण झोपताना काय ऐकतो? विकासावर कोणी बोलतो का? मी जे काही ठळक मुद्दे मांडलेले आहेत, त्यावर कोणी बोलतं का? असा सवालही संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित केले.

टुक-टुक खेळणारा शुभमन गिल कसा झाला धडाकेबाज फलंदाज, शतकानंतर उघडले गुपित

यावेळी संभाजीराजे छत्रपतींनी आपल्या राज्यातील राजकारणांचा घसरलेल्या पातळीवरुन जोरदार टीका केली आहे. त्यांनी सकाळी सकाळी माध्यमांवर झळकणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे. त्याचवेळी भाजपचे आमदार नितेश राणे यांचेही नाव न घेता घणाघाती टीका केली आहे. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वीच राज्याच्या राजकारणात आलेला शब्द खोके यावरुनही जोरदार निशाणा साधला आहे.

संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, राजकारणी माध्यमांसमोर चर्चा काय करतात तर हा मांजर, हा कुत्रा, हे खोके, हे बोके अशा पद्धतीने टीका टीपणी केली जाते, मग हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे का? असा सवालही राजेंनी यावेळी उपस्थित केला आहे. हा छत्रपती शिवाजी महारांजांचा महाराष्ट्र आहे, हा छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुलेंचा महाराष्ट्र आहे का? हा संतांचा महाराष्ट्र आहे का? हा ज्ञानोबारायांचा महाराष्ट्र आहे का? असा सवालही यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित केला आहे.

त्यावर संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, आपण सुसंस्कृत महाराष्ट्र घडवू, समाजाला महाराष्ट्राला आपण एक वेगळी दिशा देऊ, आपण फक्त छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराजांचा जयजयकार करायचा, असंही ते यावेळी म्हणाले. राजे यावेळी म्हणाले की, माझा पुढाऱ्यांना एक प्रश्न आहे की, स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनस्मारक कोणते आहेत, ते म्हणजे गड, कोट, किल्ले. माझं जाहीर आव्हान आहे की, आतापर्यंत जे खासदार आमदार झाले, मंत्री झाले असतील मुख्यमंत्री झाले असतील, त्या सर्वांनी गडकोट किल्ल्यांसाठी काय केले ते मला सांगा असाही सवाल यावेळी उपस्थित केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube