Download App

Maharashtra Politics : सत्तासंघर्षाचा निकाल लागणार? 8 ते 12 मे शिंदे-फडणवीसांसाठी महत्त्वाचे

Maharashtra Politicle Crises : राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या उलथापालथी होत आहे. यातच आगामी काळात राज्याच्या सत्तासंघर्षाबाबत महत्वाचा निकाल हाती येणार आहे. शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरणार का? हा निर्णय प्रलंबित आहे. यावर आता महत्त्वाची माहिती समोर येत आहे. पुढील आठवड्यात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंदर्भात निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Sharad Pawar Retairment : निवृत्तीचा निर्णय मागे घेत शरद पवारच राहणार अध्यक्ष, ‘या’ नेत्याचं वक्तव्य

त्यामुळे 8 ते 12 मे चा काळ शिंदे-फडणवीसांसाठी महत्त्वाचा असणार आहे. कारण या आठवड्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंदर्भात निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातून सरकारचं भवितव्य ठरणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे 15 आमदारांच्या अपात्रतेवर सर्वेच्च म्यायालया काय निर्णय देणार या कडे सर्वांचे लढ लागले आहे.

या दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक घटना घडू लागल्या आहेत. हे सगळं सुरु असतानाच आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल रमेश बैस यांची ही भेट महत्त्वाची मानली जातेय. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे आणि राज्यपाल रमेश बैस यांच्यामध्ये जवळपास तासभर बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान या बैठकीत काहीतरी मोठा निर्णय होण्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. या भेटीमागचं नेमकं कारण समोर आलेलं नाही. पण या भेटीचे वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.

Tags

follow us