Chandrakant Khaire Criticized Eknath Shinde : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल (Maharashtra Political Crisis) आता अगदी काही मिनिटांवरच येऊन ठेपला आहे. न्यायालय काय निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना दुसरीकडे राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknagth Shinde) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
खैरे म्हणाले, एकनाथ शिंदे जादूटोणा करतात. आताही ते जादूटोणा करायला गेले आहेत. हे छु छा करणारे व्यक्ती आहेत हे मला माहिती आहे, असा गंभीर आरोप खैरे यांनी केला आहे.
सत्तासंघर्ष : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाआधीच संजय राऊतांचं मोठं विधान…
ते पुढे म्हणाले, अब्दुल सत्तार, उदय सामंत काय म्हणतात याकडे मी लक्ष देत नाही. ते म्हणत असतील की शिंदे हे धार्मिक आहेत. पण ते काही देवपूजा करत नाहीत. ते छु छा करतात. रात्री अपरात्री दोन वाजता कुठेतरी जात असतात, ते जादूटोणा करतात, असा दावा खैरे यांनी केला.
सर्वोच्च न्यायालयाच्या संभाव्य निकालावर खैरे म्हणाले, मी काही न्यायालयाकडे मागू शकत नाही. मात्र मी देवाकडे मागणे मागितले आहे. न्यायालयाचा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागावा अशी मागणी मी केली आहे, असे खैरे म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्तासंघर्षाचा तिढा आज 11 एप्रिल सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) सोडवणार आहे. न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्तासंघर्षाच्या निकालावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. सर्वोच्च न्यायालयात उद्या सकाळी 11 वाजून 40 मिनीटांनंतर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Chief Justice Dhananjay Chandrachud)निकालपत्राचे वाचन करणार आहेत.