सत्तासंघर्ष : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाआधीच संजय राऊतांचं मोठं विधान…

सत्तासंघर्ष : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाआधीच संजय राऊतांचं मोठं विधान…

संपूर्ण महाराष्ट्राला सत्तासंघर्षाचा निकाल कधी येणार? याकडं लागलं आहे. उद्या सर्वोच्च न्यायालयात सत्तासंघर्षाचा निकाल होणार आहे. त्याआधीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी(Sanjay Raut) मोठं विधान केलंय. जे लोकं म्हणतात निकाल आमच्याच बाजून लागणार आहे त्यांनी काहीतरी गडबड केलीय, असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलंय. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात(Suprme Court) सत्तासंघर्षाचा निकालाविषयी प्रतिक्रिया देताना राऊतांनी हे वक्तव्य केलंय.

Shinde Vs Thackeray : सत्तासंघर्षात आत्तापर्यंत काय-काय घडले? जाणून घ्या एका क्लिकवर

यावेळी संजय राऊत म्हणाले, देशात विधानसभा, संसद, न्यायालय संविधानानूसार काम करतात की नाही हे उद्या कळणार आहे. देशाची न्यायव्यवस्था स्वतंत्र की कोणाच्या दबावाखाली काम करते, याचाही फैसला उद्या होणार असून जे लोकं आमच्या बाजूने निकाल लागणार असल्याचं म्हणातहेत त्यांनी काहीतरी गडबड केलीय, असं राऊतांनी स्पष्ट केलंय.

राणीच्या बागेत नवीन पाहुण्यांचे आगमन, पर्यटकांसाठी मोठी पर्वणी

आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. आमच्याच बाजूने निकाल लागणार आहे, असं आम्ही म्हणत नाही पण आम्हाला उद्या न्याय मिळणार आहे. उद्या सर्वोच्च न्यायालयात देशाच्या भविष्याचा निकाल लागणार आहे. सरकार येईल, जाईल पण सर्वोच्च न्यायालयात भविष्याचा निकाल होणार आहे.

सत्यजीत तांबेंनी घेतली चंद्रकांत पाटलांची भेट, चर्चांना उधाण

सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर होण्याआधीच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी(Devendra Fadnvis) मोठं विधान केलंय. आमची केस मजबूत असून आम्ही आशावादी आहोत. योग्य निकाल येईल तोपर्यंत आपण थांबलं पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे, त्याबाबत आत्ता अंदाज लावणं योग्य नाही. मात्र, आम्ही पूर्णपणे आशावादी असल्याचं भाकीत फडणवीसांनी आधीच केलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपासूनच विद्यामान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यावरुन आता ज्येष्ठ घटनातज्ञ उल्हास बापट यांनी आपलं मंत मांडलंय. बापट म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने जर आधीची परिस्थिती पुन्हा आणण्याचा (स्टेटस् को अॅंटी) निर्णय दिला तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतात. दहाव्या सूचीनूसार 16 आमदार अपात्र ठरले पाहिजेत जर असं झालं तर उर्वरित 24 आमदार अपात्र ठरु शकतील, असंही ते म्हणाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube