Download App

राज ठाकरेंच्या भेटीमागे CM शिंदेंचा पॉवर गेम; ‘इलेक्शन पॉलिटिक्स’ ‘उबाठा’ला देणार टेन्शन!

प्रफुल्ल साळुंखे, (विशेष प्रतिनिधी)

Maharashtra Politics : आगामी सर्वच निवडणुकांसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हा भाजपाचा (Lok Sabha Election 2024) प्रमुख विरोधक आहे. उबाठा गट जसा भाजपसाठी डोकेदुखी आहे तसा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेसाठी देखील डोकेदुखी आहे. उबाठा शिवसेनेची अधिकाधिक मते कशी कमी करता येतील, अथवा उबाठा गटाला अडचणीचे ठरतील असे गट पक्ष शिंदेंच्या शिवसेनेला हवे आहेत. त्यातूनच शिंदे यांनी मनसे म्हणजेच राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सोबत जुळवून घेतल्याचे बोलले जात आहे. राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) या दोन्ही नेत्यांच्या भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे.

शिवसेनेमधून एकनाथ शिंदे बाहेर पडले. पण, शिवसैनिकांची सहानुभूती त्यांना मिळू शकली नाही. कारण शिवसैनिकांची सहानुभूती ठाकरे कुटुंबीयांशी राहिली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सोबत नसले तरी मनसेचे (MNS) राज ठाकरे सोबत असणे शिंदे यांना महत्वाचे आहे. तसेही शिवसेनेत असल्यापासून एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा राज ठाकरे अधिक जवळचे वाटत राहिले. ही मैत्री तशी जुनी आहे.

Raj Thackeray : ‘इंजिनाची वाफ योग्य वेळी बाहेर काढणार’ राज ठाकरेंचा रोखठोक इशारा

आगामी लोकसभा , विधानसभा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीत एक ठाकरे आपल्या सोबत असावेत हे शिंदेंना हवं आहे. भाजपला देखील कायम वाटत राहिले. जेंव्हा शिवसेना एकसंघ होती तेव्हाही भाजप-सेना युती असताना भाजपने मनसेला आतून हवा दिली. शिवसेनेला कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. एव्हाना मुंबईत लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीत तसेच महापालिकेच्या निवडणुकीत मराठी मतांच्या विभागणीसाठी मनसेचा खुबीने वापर झाला हे कुणीही नाकारू शकत नाही. मनसेला जशी भाजपाने हवा दिली तशीच हवा अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना दिली गेली. पण हिंदी भाषिकांना विरोध करणाऱ्या मनसेला भाजप आणि काँगेसने आघाडी युतीपासून दूर ठेवले.

या प्रत्येक वेळी मनसेने स्वतंत्रपणे निवडणूक लढावी हे प्रयत्न झाले. यावेळी शिंदे हे मनसेला सोबत घेऊन निवडणूक लढण्याच्या तयारीत होते. भाजपसोबत असलेले हिंदी भाषिक आणि मनसेला सोबत घेऊन मराठी मतांची जुळवणी करत शिंदे यांना लोकसभा विधानसभा आणि मुंबई महापालिका काबीज करायची आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष आणि निशाणी ताब्यात घेतली असली तरी मुंबईत अजूनही स्वतःची ताकद बनवू शकले नाहीत.

त्यासाठी त्यांना राज ठाकरे यांची मदत हवी आहे. राज ठाकरे यांचा करिश्मा केवळ मुंबईपुरता आहे असंही नाही. कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिका तसेच पुणे, रायगड , सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या कोकणच्या पट्ट्यात काही मतांच्या बांधणीसाठी मनसेची गरज शिंदे गटाला आहे. राज ठाकरे हे शिंदे गटाबरोबर आले तर सभा गाजवणारा एक नेता देखील शिंदे गटाला मिळेल हे नक्की.

Eknath Shinde अन् राज ठाकरे एकत्र येणार; संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य

राजकारणात जर तर यांना महत्त्व नाही. असं असलं तर शिवसेना पक्षचिन्हाबाबत निर्णय झाला मूळ शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडे गेली तर शिंदे गटाच्या अनेक आमदारांसाठी मनसे हा एक पर्याय असू शकतो अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. पण तुर्तास उबाठा गटाच्या मराठी मतांत अधिकाधिक विभागणी करणे आणि ती आपल्याकडे खेचण्यासाठी शिंदे यांची मनसेसाठी साखर पेरणी सुरू आहे.

follow us

वेब स्टोरीज