Vijay Wadettiwar : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी पुण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शाह यांची भेट घेतल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, जयंत पाटील यांनीच माध्यमांसमोर येत आपण अमित शाह यांना कधीच भेटलो नाही, असे सांगितले. तसेच गैरसमज पसरवणाऱ्या बातम्या दिल्या म्हणून वृत्तवाहिन्यांनाही फटकारलं. तरीही अशा चर्चा सुरूच आहेत. यावर आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जयंत पाटीलही शरद पवारांची साथ सोडणार? पुण्यात अमित शाह-जयंत पाटलांची भेट
हे सगळं बदनाम करण्यासाठी सुरू आहे. यात काहीच तथ्य नाही. मी स्वतः जयंत पाटील यांच्याबरोबर चर्चा केली आहे. त्यांनी सांगितलं मी मुंबईतच होतो. मी त्यांच्या अनेक नेत्यांशी बोललो. त्यांनीही तेच सांगतिलं. त्यामुळे मला विश्वास आहे की जयंत पाटील हे अशा टोळीत नक्कीच जाणार नाहीत. ते आमच्याबरोबरच राहतील.
गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याच्या चर्चांवर जयंत पाटील यांनीच खुलासा केला होता. जयंत पाटील यांनीच माध्यमांसमोर येत खुलासा दिला आहे. मी गृहमंत्री अमित शाह यांनी कधी भेटलो याचे संशोधन करा. चर्चा कोण करत आहे. त्यांच्याकडेच याबाबत चौकशी करा. मी कालही इथेच होतो आणि आजही इथेच आहे. मी पुण्याला कधी गेलो तुम्हीच सांगा. मी अमित शाह यांना भेटलोच नाही, असे जयंत पाटील म्हणाले होते.
पाटील पुढे म्हणाले, ज्या बातम्या येत आहेत त्यातून माझी करमणूक होत आहे. माझ्याबद्दल यातून गैरसमज पसरत आहेत. माझ्यावर कुणाचाही दबाव नाही. मी शरद पवार साहेबांची रोज भेट घेत आहे. कुठे गेलोच तर तुम्हाला सांगेन.
उद्धव ठाकरे महाराष्ट्र अन् पक्षासाठी नष्टर.., चित्रा वाघ यांच्या ट्विटने लक्ष वेधलं