Download App

सहा महिने जातो, निधी आणतो अन् परत येतो; जयंत पाटलांनी सांगितली शिंदे गटातील प्रवेशाची बात

Jayant Patil  News : राज्यात जसजशा निवडणुका जवळ येत आहेत तसे पक्षांतराचे प्रमाण वाढले आहे. शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. या घडामोडींवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant patil) यांनी भाष्य केले आहे. पाटील आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

पाटील म्हणाले, शिंदे गटात गेलेले काही जण आत्ताच मला भेटले. त्यांनी आताच आमच्या पक्षात प्रवेश केला आहे. शिंदे गटात गेलेले लोक हे तात्पुरते तिथे गेले आहेत. शिंदेंची सत्ता आहे. शिंदे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत सोयी सवलती मिळत असल्याने लोक तिथे जात आहेत. एका कार्यकर्त्याने मला सांगितले की सहा महिने जातो, निधी आणतो आणि परत येतो. महत्वाच्या कार्यकर्त्याने अशी परवानगी मागितली. नगरपालिकेत निधी येणं गरजेचं आहे. मी म्हटलं जाऊन या, अशी मिश्किल टिप्पणी पाटील यांनी केली.

‘वकील’ फडणवीसांना अंधारेंचे सवाल; ठाकरेंच्या वाघिणीनं गृहमंत्र्यांना घेरलं

पुणे शिरुर लोकसभा मतदारसंघांबाबतही पाटील यांनी भाष्य केले. राष्ट्रवादीत बरेच चांगले चेहरे इच्छुक आहेत. तरीही काँग्रेस, शिवसेनेशी चर्चा केल्यानंतर काय ते आम्ही ठरवू. सोलापूरमध्ये पोटनिवडणूक नाही. मुख्य निवडणूक आल्यावर हा मतदारसंघ लढविण्यावर ठरविण्यात येईल असे स्पष्ट करत सोलापूर मतदारसंघाबाबत अधिक बोलणे त्यांनी टाळले.

नगर जिल्ह्याच्या नामांतराचे स्वागत 

नगर जिल्ह्याच्या नामांतरावर पाटील म्हणाले, नगर जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवी होळकर करण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. पण, जो बुंद से गयी वो हौद से नही आती. या सरकारला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले याच्याबद्दल काय वाटतं हे राजधानी दिल्ली येथील कार्यक्रमाने दाखवून दिले आहे, असे पाटील म्हणाले.

Madha Lok Sabha : राष्ट्रवादीची धाकधुक वाढली; आमदार शिंदे बंधुंची महत्त्वाच्या बैठकीला दांडी

Tags

follow us