‘वकील’ फडणवीसांना अंधारेंचे सवाल; ठाकरेंच्या वाघिणीनं गृहमंत्र्यांना घेरलं
Sushma Andhare On Devendra Fadnavis : शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena Thackeray group)आणि शिवसेना शिंदे गटातील (Shiv Sena Shinde group)नेते एकमेकांवर सातत्यानं आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. काही दिवसांपूर्वीच सुषमा अंधारेंनी संभाजीनगरमधील (Sambhajinagar)शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी या प्रकरणामध्ये संजय शिरसाट (Sanjay Shirsat)यांना पोलिसांकडून क्लीनचीट मिळाल्याची माहिती समोर आली. त्यावरुन आज ठाकरे गटाच्या फायरब्रॅंड नेत्या सुषमा अंधारेंनी पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
निळवंडेचं पाणी सुटलं, आता श्रेयवादाची लढाई; जयंत पाटील म्हणाले, आघाडी सरकारने…
यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या की,कालची एक घटना जी मला रात्री खूप उशीरा कळाली. की, संभाजीनगरच्या एका आमदाराने अत्यंत सवंग आणि थिल्लर भाषा केली. अशा काही लोकांची नावं घेऊन त्यांना मोठं करावसं वाटत नाही, कारण त्याचा फायदा त्यांना होतोय असं माझ्या लक्षात आलं आहे.कारण जो जास्तीत जास्त सवंग आणि ठिल्लर बोलू शकतो, त्याला आम्ही लिफ्ट देणार असं बहुतेक शिंदे गटाने ठरवलेलं दिसतंय. त्यामुळे सवंग आणि ठिल्लर भाषेत बोलणाऱ्या लोकांना प्रवक्ते करण्याची ओढ लागलेली आहे.
मला त्यांच्या संबंधाने काहीच बोलायचं नाही कारण, सभ्य लोकांशी बोलावं असा माझा होरा आहे, मी असभ्य लोकांशी बोलत नाही. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज्याचे गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांच्याशी फार बोलावसं वाटत नाही पण या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एक गुणी, अभ्यासू वकील देवेंद्र फडणवीस यांना बोललं पाहिजे असं मला वाटतं असंही ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या.
Yeh Jawaani Hai Deewani 10 Years: ‘या’ कारणासाठी एक्स कपल रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण आले एकत्र
काल माध्यमांकडून मला अशी माहिती समजली की, छत्रपती संभाजीनगरच्या एका आमदाराने जी असभ्य आणि सवंग भाषा केली, जी स्त्रीमनास लज्जा आणणारी होती, ज्या भाषेचे अनेक फुटेज पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध आहेत,एकीकडे शितल म्हात्रे प्रकरणामध्ये ओरिजनल व्हिडीओ दाखवता येत नाही तरीसुद्धा गुन्हे दाखल केले जातात.
दुसरीकडे आम्ही ओरिजनल व्हिडीओच दाखवतो तरीसुद्धा गुन्हे दाखल होत नाहीत. म्हणून आम्ही महिला आयोगाकडे धाव घेतो, आम्ही पोलीस ठाण्यात धाव घेतो पण त्यावेळी आमची तक्रार दाखल करुन घेतली जात नाही.
6 हजार रुपये देणं हा शेतकऱ्याचा सन्मान नाही, खासदार प्रीतम मुंडेंच विधान…
म्हणून आम्ही न्यायालयाकडे धाव घेतो, पण दरम्यानच्या काळामध्ये काही घटना घडतात आणि सरकारकडून सांगण्यात येतं की, अशा प्रकारची असभ्य भाषा झाली असेल तर आम्ही त्याची चौकशी करु, एसआयटी नेमू, त्यासाठी स्पेशल टीम नेमू असं सांगण्यात येतं. टीम नेमली असंही सांगण्यात येतं.
देवेंद्र फडणवीस आपण गृहमंत्री आहात, जी स्पेशल अधिकाऱ्याची कमिटी जी नेमली ती आपल्या खात्याकडून नेमली असेल, पण गृहमंत्री म्हणून आपल्याला विचारण्याऐवजी आपण आपल्या वकिलीचं आयकार्ड दाखवलं होतं, की मी एक निष्णात वकील आहे, मी वकिलीची डिग्री घेतलेली आहे, असं म्हणत आपण आपल्या वकिलीचं आयकार्ड दाखवलं होतं.
त्यामुळे वकील म्हणून आपल्याला काही प्रश्न विचारले पाहिजेत. काल छत्रपती संभाजीनगरच्या त्या आमदाराने जो अत्यंत असभ्य आणि उर्मठ आहे बोलण्यामध्ये, त्याने असं सांगितलं की पोलिसांनी मला क्लीनचीट दिली आहे, ही क्लीनचीट कशी देण्यात आली हे मला कळेल का? असा सवालही यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.