सलग दुसऱ्या दिवशीही प्रीतम मुंडेंचा भाजपला घरचा आहेर…
सलग दुसऱ्या दिवशीही भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. दिल्लीतील महिला कुस्तीपटूंचं आंदोलन आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीवर सडेतोड भाष्य करीत त्यांनी एक प्रकारे सरकारला घरचा आहेरच दिला आहे. महिला कुस्तीपटूंची दखल घेतली नाही हे लोकशाहीत स्वागतार्ह नसल्याचं त्यांनी काल म्हटलं होतं. त्यानंतर आज त्यांनी फक्त 6 हजार रुपये देणं हा शेतकऱ्यांचा सन्मान नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, सलग दोन दिवसांपासून केंद्र सरकारविरोधात बोलणाऱ्या खासदार मुंडे पहिल्या वाहिल्या ठरल्या आहेत. त्यांच्या या वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उत आला आहे. अनेकांनी तर प्रीतम मुंडेंची भाजपमध्ये घुसमट होत तर नाही ना? असा सवाल केल्याचं दिसून आलं आहे.
CM शिंदेंच्या सुनेशी वाद झाला अन् थेट पालिकेचे अधिकारी हातोडा घेऊन धडकले
लैंगिक शोषण केल्याचा आरोप भाजप नेते ब्रिजभूषण सिंह यांच्यावर ठेवत महिला कुस्तीपटूंनी दिल्लीत आंदोलन छेडलं आहे. हे आंदोलन गेल्या महिनाभरापासून सुरु आहे. मात्र, केंद्र सरकार या आंदोलनावर मूग गिळून बसल्याचं पाहायला मिळालं होतं. अखेर आंदोलनकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर भाजपच्या खासदार प्रीतम मुंडेंनी धाडस करीत भाष्य केलं. त्यानंतर केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकून यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली.
Pushpa 2 Bus Accident: ‘पुष्पा 2’ सिनेमाच्या बसचा झाला अपघात; दोन कलाकार जखमी
कुस्तीपटूंच्या आंदोलनावर भाष्य केल्यानंतर मुंडे यांनी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या योजनांवरुनही त्यांनी केंद्र सरकारच बोट दाखवलं आहे. फक्त 6 हजार रुपये देणं हा शेतकऱ्यांचा सन्मान नसल्याचं विधान त्यांनी केलं आहे. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना ही मदत शासनाकडून का दिली जातेयं? या संकल्पनेवरही त्या बोलल्या आहेत. मुंडे म्हणाल्या, आज शेतकऱ्यांच्या पिकांची जी परिस्थिती होत आहे ती मानवनिर्मित नसून नैसर्गिक आपत्तीमुळे झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या पिकांवर जागतिक मार्केटचे परिणाम होऊन जर शेतमालाचा भाव घसरत असेल तर त्यात सरकारचा रोल नसल्याचं म्हटलं आहे.
नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी हवालदिल असताना अशावेळी शेतकऱ्यांच्या काळजीपोटी सरकारकडून ही मदत दिली जात आहे. याचा अर्थ असा नाही की, शेतकऱ्यांनो पैसे घ्या आणि नूकसानीचं आम्हाला देणं घेणं नाही. या शब्दांत त्यांनी सरकारकडून शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6 हजार रुपये काक दिले जात आहेत, हे स्पष्ट केलं आहे.
Manipur violence: ‘प्रादेशिक अखंडतेशी छेडछाड केल्यास भारताचे प्रतिनिधित्व करणार नाहीत’
दरम्यान, शासन पेन्शनधारकांना पेन्शन देतं पण शेतकऱ्याांना तशी कोणतीही पेन्शन मिळतं नाही. म्हणूनच सरकारकडून शेतकऱ्यांच्या काळजीपोटी ही मदत दिली जात असल्याचं मुंडे म्हणाल्या आहेत.