Download App

बच्चू कडूंचा सचिन तेंडुलकरला अल्टिमेटम! घरासमोरच करणार आंदोलन; कारण काय?

Bacchu Kadu on Sachin Tendulkar : मास्टरब्लास्टर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर विरोधात राज्यातील राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी सचिनविरोधात दंड थोपटल आहेत. सचिन ऑनलाइन गेमच्या जाहिरातीत भाग घेत असल्याने त्याचा निषेध म्हणून बच्चू कडू यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. सचिन तेंडुलकरच्या घरासमोर प्रहार स्टाईल आंदोलन करण्यात येईल असे कडू म्हणाले. या जाहिरातीतून माघार घेण्यासाठी पंधरा दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. कडूंच्य या इशाऱ्यामुळे नवा वाद उफाळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

न्यायव्यवस्था तुम्हाला गंमत वाटली का? न्यायालयाने राणा दाम्पत्याला फटकारले !

कडू म्हणाले, सचिन तेंडुलकरच्या घरासमोर प्रहार स्टाईल आंदोलन केले जाणार आहे. भारतरत्न असलेले सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाइन गेमच्या जाहिरातीबाबत स्पष्टीकरण दिले पाहिजे. देशाचा ते अभिमान आहेत. म्हणून त्यांनी या जाहिरातीतून माघार घ्यावी, ही आमची त्यांना विनंती आहे. अन्यथा आम्हाला पर्यायी मार्ग शोधावा लागेल, असा इशारा कडू यांनी दिला.

सचिनला नारळपान देणार

आम्ही सचिन यांच्या घरासमोर आंदोलन करू शकतो. भारतीयांची ऑनलाइन गेमपासून मुक्तता व्हावी म्हणून आम्ही त्यांना नारळपान देऊ. नारळ देऊ. त्यांना नारळ देऊन त्यातून बाहेर निघण्याची विनंती करू. आमचं आंदोलन नेहमीच वेगळं असतं. यंदाही तसेच काहीतरी असेल. लोकं सुपारी घेतात, तुम्ही नारळ घ्या. जाहिरातच नाही तर ऑनलाइन गेमच हद्दपार करा, असे कडू म्हणाले.

.. तर आम्ही आंदोलनही केलं नसतं

राज्यात ऑनलाइन गेम बंद व्हावा यासाठी आम्ही विरोध करत आहोत. जाहिरातीला विरोध करत आहोत. सचिन तेंडुलकर तुम्ही भारतरत्न आहात. त्यामुळेच आमचा त्यांनी ऑनलाइन गेमची जाहिरात करण्यास विरोध आहे. ते जर भारतरत्न नसते तर आम्ही आंदोलनही केलं नसतं, असेही त्यांनी स्पष्ट केले. सचिन तेंडुलकरने या जाहिरातीतून माघार घ्यावी यासाठी आम्ही त्यांना पंधरा दिवसांची मुदत देऊ त्यानंतर मात्र घरासमोरच आंदोलन करू, असा इशाराही कडू यांनी दिला.

Tags

follow us