न्यायव्यवस्था तुम्हाला गंमत वाटली का? न्यायालयाने राणा दाम्पत्याला फटकारले !

  • Written By: Published:
न्यायव्यवस्था तुम्हाला गंमत वाटली का? न्यायालयाने राणा दाम्पत्याला फटकारले !

मुंबईः माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेरील हनुमान चालिसा पठणप्रकरणी विशेष न्यायालयात सुनावणी सुरू आहे. खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांना गुरुवारी न्यायालयात हजर राहायचे होते. परंतु दोघेही न्यायालयात अनुपस्थित राहिले. त्यावरून न्यायाधीशांनी नाराजी व्यक्ती केली. न्यायव्यवस्था तुम्हाला गंमत वाटली का ? असा सवाल न्यायाधीशांनी करत या दोघांना फटकारले आहे. या दोघांना न्यायालयात हजर राहण्याचे अनेकदा आदेश देऊन हे दोघे हजर राहत नसल्याने न्यायाधीशांनी नाराज व्यक्त केली आहे. (mumbai special court rebuked mp navneet rana and ravi rana)


मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टचं सांगितलं…

मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण प्रकरणाच्या खटल्याची विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर सुनावणी सुरू आहेत. गुरुवारी सुनावणी ठेवण्यात आली होती. अधिवेशन सुरू असल्याने खासदार नवनीत राणा या लोकसभेत हजर होत्या. नवनीत राणा यांची अनुपस्थिती समजू शकते. पण आमदार रवी राणा अनुपस्थित का ? असा प्रश्न न्यायाधीशांनी उपस्थित केला आहे.

मणिपूरमधील सद्यस्थिती नेहरु अन् काँग्रेसमुळेच! नॉर्थ ईस्ट आमच्या काळजाचा तुकडा : PM मोदींची टीका

राणा दाम्पत्याच्या चालढकल वृत्तीवर विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांनी ताशेरे ओढळे. न्यायव्यवस्था म्हणजे गंमत वाटली का ? अशा तीव्र शब्दांत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. पुढील सुनावणीच्या वेळी राणा दाम्पत्याने उपस्थित राहण्याचे आदेश देताना ही शेवटची संधी असल्याचे न्यायालयाने बजावले आहे.

मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कायदा व सुव्यवस्था बिघडणे, पोलिसांच्या कामात अडथळा आणल्याचा आरोप राणा दाम्पत्यावर आहे. दोघेही जामिनावर बाहेर आहेत. सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची अट त्यांना जामीन मंजूर करताना घालण्यात आली होती. परंतु वारंवार हजर राहण्याचे आदेश देऊन राणा दाम्पत्य सुनावणीसाठी उपस्थित राहत नाहीत.

सरकारी पक्षावरही नाराजी

गुरुवारच्या सुनावणीलाही राणा दाम्पत्य अनुपस्थित होते. त्यांचे वकीलही न्यायालयात हजर नव्हते. तर सरकारी वकील आणि तपास अधिकारीही गैरहजर राहिले. राणा यांचे वकील आजारपणामुळे अनुपस्थित असल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. सरकारी पक्षही हजर न राहिल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube