Download App

एवढी सत्तेची मुजोरी कुणामुळे? आमदार लोणीकरांच्या वक्तव्यावर आव्हाडांचा सवाल

बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी एका कार्यक्रमात शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान केले. यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केलं.

  • Written By: Last Updated:

MLA Jitendra Awhad on Babanrao Lonikar : परतूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी एका कार्यक्रमात बोलताना शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान केले. तेच कुचकळवाट्यावर बसलेले पाच-सहा कारटे, त्यांच्या मायचा पगार अन् त्याच्या बापाला पेरणीसाठी सहा हजार पंतप्रधान मोदींनी (PM Modi) दिले. तुझ्या अंगावरील कपडे आणि पायातील बूट, चप्पल सुध्दा आमच्यामुळेच असल्याचं विधान त्यांनी केलं. यावर आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हा (MLA Jitendra Awhad) यांनी भाष्य केलं.

NHAI वर दुचाकी वाहनांनाही द्यावा लागणार टोल?; गडकरींनी दिलं स्पष्टीकरण 

आव्हाड यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट करत म्हटलं की, हा हे खरंय. फक्त हेच नाही युद्ध तुम्हीच थांबवता. २०१४ नंतर भारत तुमच्यामुळेच स्वतंत्र झाला. जी काही प्रगती झाली तुमच्यामुळेच झाली… झाडं फळं तुमच्यामुळेच देतात. नद्या तुमच्यामुळेच वाहतात. लोकं सकाळी उठून कामाला तुमच्यामुळेच जातात. एवढंच कशाला, सूर्य तुमच्यामुळेच उगवतो. बस का अजून काही बाकी आहे. कसं आहे माहितेय का, भरलेल्या गाडीच्या मागं पुढे पळून एखाद्याला वाटतं त्याच्यामुळेच गाडी ओढली जाते. असतो एखाद्याचा गैरसमज चालायचंच… ही सत्तेची मुजोरी कुणामुळे?, असा सवाल आव्हाड यांनी विचारला आहे.

लोणीकर यांनी केलेल्या या विधानानंतर विरोधकांनी त्यांना धारेवर धरलं आहे. रोहिणी खडसे यांनीही जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी एक्सवर लिहिलं की, सोशल मीडियावर आपल्या विरोधात व्यक्त होणाऱ्या तरुणांविषयी भाजपचे आमदार बघा कसे बोलत आहेत ! ही या लोकांची भाषा, त्यांचा अहंकार, त्यांची संस्कृती आहे !

आमदारकी, खासदारकी भोगली पण एक शब्द तरी पूर्ण केला का? विखेंचा लंकेंवर निशाणा 

एवढा माज बरा नव्हं लोणीकर !
आमदार महोदय, तुमचे शेठ जो २५ लाखांचा सूट घालतात, तो सामान्य जनतेमुळे मिळाला आहे, लाखो रुपयांचा गॉगल घालतात ती सामान्य जनतेची देण आहे. इतकेच काय तुम्ही राहता तो बंगला, फिरवता ती गाडी जे काही मिळालंय ते जनतेच्या आशीर्वादाने मिळाले आहे, त्या मुलांच्या आईबापांमुळे मिळाले आहे. एवढा माज बरा नव्हं लोणीकर ! हीच जनता लोण्याचे तूपही करू शकते हे लक्षात असू द्या !, अशा भाषेत खडसेंनी समाचार घेतला.

काय म्हणाले होते लोणीकर?
ते कुचकळवाट्यावर बसलेले पाच-सहा कारटे, त्याच्या मायचा पगार बबनराव लोणीकरणे केला. त्याच्या बापाला पेरणीसाठी सहा हजार पंतप्रधान मोदींनी दिले. तुझ्या मायच्या, तुझ्या बहिणीच्या आण बायकोच्या नावावर लाडकी बहीण योजनेचे पैसे आल. तुझ्या अंगावरील कपडे आणि पायातील बूट, चप्पल सुध्दा आमच्यामुळेच आहेत. तुझ्या हातातलं डबडं, तो देखील आमच्यामुळेच आहे. आमचेच पैसे घेतो आणि आमच्याच तंगड्या वर करतो. आमचंचं घेतो आणि आम्हालाच बोलतो का, आमचं घेऊन आमच्याबद्दल लिहितोस का, अशी भाषा लोणीकरांनी वापरली.

follow us