NHAI वर दुचाकी वाहनांनाही द्यावा लागणार टोल?; गडकरींनी दिलं स्पष्टीकरण

Toll For Two Wheelers On NHAI : राष्ट्रीय महामार्ग वापरणाऱ्या दुचाकी वाहनांना राष्ट्रीय महामार्गावरही टोल (Toll) भरावा लागणार असल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर आता यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी एक्सवर पोस्ट करत स्पष्टीकरण दिले आहे.
गडकरींची पोस्ट काय?
राष्ट्रीय महामार्गावर दुचाकींना टोल भरावा लागणार असल्याच्या वृत्ताबाबत गडकरींनी म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी वाहनांवर टोल कर लादण्याबाबत दिशाभूल करणाऱ्या बातम्या काही माध्यमे पसरवत आहेत. मात्र, असा कोणताही निर्णय प्रस्तावित नाही. दुचाकी वाहनांना टोलवर पूर्णपणे सूट देणे सुरूच राहील असे गडकरींनी म्हटले आहे.
मोदींनी तुझ्या बापाला 6 हजार पेरणीला दिलेत; लोणीकरांची जीभ घसरली, राजकीय वर्तुळात खळबळ
📢 महत्वपूर्ण
कुछ मीडिया हाऊसेस द्वारा दो-पहिया (Two wheeler) वाहनों पर टोल टैक्स लगाए जाने की भ्रामक खबरें फैलाई जा रही है। ऐसा कोई निर्णय प्रस्तावित नहीं हैं। दो-पहिया वाहन के टोल पर पूरी तरह से छूट जारी रहेगी। बिना सच्चाई जाने भ्रामक खबरें फैलाकर सनसनी निर्माण करना स्वस्थ…
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) June 26, 2025
🚨 Two-wheelers in India will no longer enjoy the privilege of a toll-free experience at highway entry points from July 15, 2025. pic.twitter.com/HRQisu3yVg
— Indian Tech & Infra (@IndianTechGuide) June 26, 2025
देशात NHAI चे किती टोल प्लाझा?
NHAI च्या टोल इन्फॉर्मेशन सिस्टीमच्या नोंदीनुसार, काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत देशात एकूण १०५७ एनएचएआय टोल आहेत. त्यापैकी सुमारे ७८ टोल एकट्या आंध्र प्रदेशात आहेत. बिहारमध्ये ३३ राष्ट्रीय महामार्ग टोल आहेत तर उत्तर प्रदेशात १२३ टोल प्लाझा आहेत.
15 ऑगस्टपासून FASTag चा वार्षिक पास
यापूर्वी टोलच्या नियमात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार येत्या 15 ऑगस्टपासून वाहनचालकांना फास्टटॅगचा वार्षिक पास बनवता येणार आहे. हा पास वार्षिक 3 हजार रूपयांचा असेल अशी मोठी घोषणा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) केली आहे.
१५ ऑगस्ट २०२५ पासून खाजगी वाहनांसाठी (जसे की कार, जीप, व्हॅन इ.) ३,००० रुपयांचा फास्टॅग (Fastag) आधारित वार्षिक पास जारी केला जाईल. हा पास सक्रिय झाल्याच्या तारखेपासून एक वर्ष किंवा २०० ट्रिपसाठी, जे आधी असेल ते वैध असेल. या पाससाठी लवकरच एक स्वतंत्र लिंक NHAI आणि MoRTH च्या वेबसाइटवर आणि ‘हायवे ट्रॅव्हल अॅप’ वर उपलब्ध करून दिली जाईल, ज्यामुळे पासचे सक्रियकरण आणि नूतनीकरण सोपे आणि सोयीस्कर होईल असे गडकरी यांनी म्हटले आहे.
ब्रेकिंग ! आता दहावीच्या परीक्षा वर्षातून दोनदा होणार ; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
नवीन पासचा नेमका उद्देश काय?
नवीन वार्षिक पास धोरणाचा उद्देश ६० किमीच्या परिघात असलेल्या टोल प्लाझांशी संबंधित दीर्घकालीन समस्या सोडवणे आहे. एकाच डिजिटल व्यवहाराद्वारे टोल पेमेंट सोपे करणे, टोल प्लाझावरील प्रतीक्षा वेळ कमी करणे, गर्दी कमी करणे आणि वादाचे प्रसंग टाळणे यासाठी होणार आहे.
फास्टॅग म्हणजे काय?
फास्टॅग हे एक उपकरण आहे जे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) तंत्रज्ञानाचा वापर करते. ज्यामुळे टोल पेमेंट थेट त्याच्याशी जोडलेल्या प्रीपेड खात्यातून करता येते. ते तुमच्या वाहनाच्या विंडस्क्रीनवर चिकटवले जाते आणि तुम्हाला रोख व्यवहारांसाठी न थांबता टोल प्लाझातून जाण्याची परवानगी देते. तुम्हाला तुमच्या गरजेनुसार टॅग रिचार्ज/टॉप अप करावा लागतो.
गुडन्यूज! आता PF खात्यातून काढता येतील 5 लाख रुपये; सरकारने नियमात केला बदल
फास्टॅगचे फायदे
FASTag वापरण्याचे अनेक फायदे आहेत. याच्या वापरामुळे वाहनचालकांना त्यांच्या टॅग खात्यात केलेल्या सर्व व्यवहारांसाठी नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एसएमएस अलर्ट मिळतो. यामुळे वाहनचालकांना टोल पेमेंटसाठी रोख रक्कम जवळ बाळगावी लागत नाही. डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे फास्टटॅग खाते ऑनलाइन रिचार्ज करता येते. याशिवाय, ग्राहक FASTag ग्राहक पोर्टलवर लॉग इन करून त्यांचे स्टेटमेंट पाहू शकतात