Download App

तुमच्याच 19 जागा मग काँग्रेस-राष्ट्रवादीचं काय? शिरसाटांचा राऊतांना खोचक सवाल

Sanjay Raut vs Sanjay Shirsat : आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची चर्चा सुरू झाली आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत आघाडीचे नेते वक्तव्ये करत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही लोकसभेच्या जागांबाबत दावा केला होता. त्याला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी प्रत्युत्तर दिले.

शिरसाट म्हणाले, संजय राऊत बंद केबिनमध्ये बसून इतक्या जागा, तितक्या जागा असे सांगू शकतात. पण, परिस्थिती काय आहे ? हे त्यांना सुद्धा माहिती नाही. मागील वेळी शिवसेनेचे 19 खासदार निवडून आले होते. ते शिवसेना भाजप युतीमुळे. आता पुन्हा ते सगळ्याच जागांवर दावा करत असतील तर ते हास्यास्पद आहे.

लोकसभेत ठाकरे गट 18 जागांवर लढणार?; राऊतांच्या दाव्याने काँग्रसची धडधड वाढली

शिरसाट यांनी आज राजधानी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, आता त्यांच्याकडे 19 पैकी किती खासदार उरलेत. त्यांच्याकडे तीन ते चार खासदार राहिले आहेत. काही राज्यसभेचे आहेत. अशात जर तुम्ही लोकसभेच्या 19 जागांवर दावा सांगितला तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं काय होईल? असा सवाल शिरसाट यांनी केला.

कर्नाटकातील परिस्थिती वेगळी होती. त्याचा संबंध महाराष्ट्राशी लावता येणार नाही. तुम्ही सुद्धा बिहार, उत्तर प्रदेशात निवडणुका लढल्या होत्या. तिथे तर नोटापेक्षाही कमी मते मिळाली होती. त्यामुळे अन्य राज्यातील निकालांची तुलन महाराष्ट्रातील राजकारणाशी करणे योग्य ठरणार नाही, असा टोला शिरसाट यांनी ठाकरे गटाला लगावला.

काय म्हणाले राऊत ?

याआधी राऊत म्हणाले होते, की महाविकास आघाडीच्या बैठकीत 16+16+16 चा फॉर्म्युला ठरलाय अशा बातम्या मला माध्यमांद्वारे कळत आहे. मात्र आमचा अजून असा काही फॉर्म्युला ठरलेला नाही. तसेच महाविकास आघाडीत मतभेद नाही. आम्ही निवडणुका या एकत्र लढणार आहोत. आम्ही या घटनाबाह्य सरकारला घालवू. आमचे 19 खासदार होते आणि राहतील. जिंकलेल्या जागा या जिंकलेल्या असतात त्या बदलू शकत नाहीत. आमचा आकडा कायम आहे.

असंवैधानिक विधानांना काडीमात्र किंमत देत नाही, राऊतांच्या टीकेला नार्वेकरांचं प्रत्युत्तर

Tags

follow us