Download App

“..म्हणून २००४ मध्ये भुजबळांना CM केलं नाही”, शरद पवारांनी सांगितलं कारण

जर २००४ मध्ये छगन भुजबळ यांच्याकडे नेतृत्व दिलं असतं तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक झाली असती.

Sharad Pawar on Chhagan Bhujbal : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Elections) सध्या मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. आधी अमित शाहा यांनी निवडणुकीनंतर मुख्यमंत्रि‍पदाबाबत निर्णय घेऊ असे सांगितले होते. त्यानंतर शरद पवार यांनी एका मुलाखतीत ज्या पक्षाचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवार यांनी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याबाबत हा गौप्यस्फोट केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

सन २००४ मध्ये छगन भुजबळ यांना मंत्री का केलं नाही यामागचं कारण शरद पवार यांनी एका मुलाखतीत सांगतिलं. या संदर्भातील एका प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, जर २००४ मध्ये छगन भुजबळ यांच्याकडे नेतृत्व दिलं असतं तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक झाली असती. सन २००४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ शकत होता. त्यावेळी मुख्यमंत्रि‍पदासाठी अजित पवार, छगन भुजबळ या नेत्यांची नावं आघाडीवर होती. मात्र शरद पवारांनी मुख्यमंत्रिपद काँग्रेसला दिलं आणि (Congress Party) त्या बदल्यात मोठी खाती पदरात पाडून घेतली.

“..अन् आता तेच मला रिटायर करायला निघालेत” दाखला देत अजितदादांचं शरद पवारांना उत्तर

शरद पवार म्हणाले, २००४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. तरी सुद्धा मी मुख्यमंत्रिपद काँग्रेसला दिलं. त्यावेळी ज्येष्ठ म्हणून माझ्या डोळ्यांसमोर छगन भुजबळ यांचं नाव होतं. पण, भुजबळांचं राजकारण तुम्ही पाहा. त्यांना तुरुंगात जावं लागलं. त्या काळात जर भुजबळांच्या हातात राज्याचं नेतृत्व दिलं असतं तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक झाली असती.

२००४ मध्ये मुख्यमंत्री होण्याची संधी होती. पण मिळाली नाही अशी खंत अजित पवार यांनी अनेकदा बोलून दाखवली होती. यावरही उत्तर देताना आपण मुख्यमंत्री पदाऐवजी मंत्रिपदं जास्त घेतल्याचे स्पष्टच सांगितलं. आर. आर. पाटील, जयंत पाटील, अजित पवार हे तरुण नेते पुन्ही कॅबिनेट मंत्री झाले. नव्या नेतृत्वाला बळ देण्यासाठी हा निर्णय महत्वाचा होता असे शरद पवार म्हणाले.

सुप्रिया सुळेंनी दिला थेट पुरावा, पत्रकार परिषदेत सुनील टिंगरेंनी शरद पवारांना पाठवलेली नोटीसच दाखवली

follow us