‘अजितदादा काल खरं तेच बोलले’; वडेट्टीवारांच्या इशाऱ्यामागचं पॉलिटिक्स काय?

Vijay Wadettiwar : महाविकास आघाडीतून फुटून राज्य सरकारला पाठिंबा दिल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) गटावर विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये काँग्रेस (Congress) नेते आघाडीवर आहेत. विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी स्वीकारल्यापासून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. आताही त्यांनी अजित पवार यांच्या बारामती येथील कालच्या सभेवरुन त्यांच्यावर खोचक […]

Vijay Vadettiwar

Vijay Vadettiwar

Vijay Wadettiwar : महाविकास आघाडीतून फुटून राज्य सरकारला पाठिंबा दिल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) गटावर विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये काँग्रेस (Congress) नेते आघाडीवर आहेत. विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी स्वीकारल्यापासून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. आताही त्यांनी अजित पवार यांच्या बारामती येथील कालच्या सभेवरुन त्यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे.

कालच्या सभेत अजित पवार यांनी खरं सांगितलं ते सत्तेसाठी नाही. तर ईडीमुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांमुळे सत्तेतर गेले असावेत. मी त्यावेळी मुख्यमंत्री झालो असतो याचा अर्थ मुख्यमंत्रीपदाची सुप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी गेले हे समजू शकतो, त्या पदासाठी नाही मग कशासाठी केले हे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे, असा टोला वडेट्टीवार यांनी अजितदादांना लगावला. वडेट्टीवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

खळबळजनक! भाजप खासदाराच्या घरी फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला 10 वर्षीय मुलाचा मृतदेह

माजी राज्यपाल कोश्यारी खरंच बोलले

माजी राज्यपाल कोश्यारी यांनी काल एका कार्यक्रमात मला अजित पवार यांची दया येते. ते उपमुख्यमंत्री पदासाठी कायमच तयार असतात असे वक्तव्य केले होतेय. यावरही वडेट्टीवार यांनी भाष्य केले. माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे पहिल्यांदा सत्य बोलले, हे मी सुद्धा मान्य करतो, अशी खोचक टीका त्यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस शंभर टक्के फुटलीच

स्पर्धा की आपापसात ज्या चर्चा आहे, त्यातून उत्तर मिळायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी शंभर टक्के फुटलेली आहे, नऊ आमदार फुटल्यामुळे हे आता स्पष्ट झालं आहे. अजित पवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुणगान करण्याचा दृष्टांत दहा वर्षापूर्वी का झाला नाही? आत्ताच का झाला ते त्यांनाच माहित, असेही वडेट्टीवार म्हणाले. रस्ता खराब झाला ते योग्य आहे. यापूर्वी आंदोलन होण्याची गरज होती. समृद्धी पेक्षा तो रस्ता जास्त महत्वाचा आहे, अनेक जण कोकणात जातात, त्या रस्त्यावर आंदोलन होत असतील त्यामुळे नक्कीच रस्ता दुरुस्त होईल, अशी अपेक्षा वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

मुघलांचे गुलाम आज महाराष्ट्राला हिंदुत्व शिकवत आहेत : लव्ह जिहादवरुन राऊतांचा भाजपवर निशाणा

Exit mobile version