Download App

सावरकरांना दाढी वाढवलेले आवडत नव्हते, आता शिंदे दाढी कापणार का ? ; राऊतांचा सवाल  

Sanjay Raut : आज छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची सभा होत आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. दुसरीकडे आज सत्ताधारी गटाने सावरकर गौरव यात्रेला सुरुवात केली आहे. या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेत तापले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

राऊत म्हणाले, की ‘आजच्या सभेला आम्ही उपस्थित नसणार आहे. परंतु आमचे सर्व महत्त्वाचे नेते व जिल्हा पातळीवरील नेते प्रामुख्याने उपस्थित असणार आहेत. लोक प्रमुख नेत्यांचे भाषण ऐकायला येणार आहेत. सभेची तयारी पूर्ण झाली आहे आणि मोठा जल्लोषात सभा होणार’ असल्याचे त्यांनी सांगितले.

सभेच्या पोस्टरवर राहुल गांधींचा फोटो का नाही ? जयंत पाटलांनी स्पष्टचं सांगितले

 

‘आज सावरकर गौरव यात्रा अनेक ठिकाणी निघत आहे. त्यांना ती यात्रा करु दे परंतु, सावरकरांनी वैज्ञानिक दृष्टीकोन दिलेला आहे. या देशाने त्याचे स्वागत केले पाहिजे. सावरकरांचे दिशा देणारे विचार आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांना जर मिंधे सरकार आणि भाजप पाळणार असेल तर त्यांचे स्वागत आहे.’

‘सावरकरांनी हिंदुत्वचा विचार काढताना पुरोगामी आणि विज्ञानवाद याला आधार दिलेला आहे. म्हणजे, भारतीय जनता पार्टी म्हणत आहे की काय हे गोमाता आहे सावरकरांचे याव वेगळं म्हणणं आहे. हा विचार भाजपला मान्य आहे का ?’, असा सवाल त्यांनी केला.

सर्वसामान्यांना मोठा झटका; वीज दरात मोठी वाढ

‘शेंडी जानव्याचं हिंदुत्व सावरकर ते बाळासाहेबांनी देखील मानलं नाही. सावरकरांना दाढी वाढवलेले आवडत नाही तर आता शिंदे दाढी कापणार आहे का? आता या रॅलीमध्ये एकनाथ शिंदे हे दाढी काढून येणार आहेत का ?, तुम्ही सावरकरांचे विचार त्यांचे साहित्य वाचले आहे का ?” असे खोचक सवाल राऊत यांनी केले. आधी यात्रा काढणाऱ्यांनी सावरकरांच्या साहित्याचे पारायण करावे व साहित्य वाचावे आणि मग त्यांनी सावरकर यात्रा काढावी’, असा सल्लाही त्यांनी दिला.

सरकारकडून अपेक्षा म्हणजे रेड्याकडून दुधाची अपेक्षा

धमकी प्रकरणी राऊत म्हणाले, ‘सरकारकडून आम्ही सुरक्षा मागितलेली नाही. सरकार हे विरोधकांच्या बाबतीत अत्यंत बेफिकीर आहे. सरकारकडून अपेक्षा करणं म्हणजे रेड्याकडून दुधाची अपेक्षा करण्यासारखेच’ असल्याचा टोला राऊत यांनी लगावला.

 

 

 

 

 

 

 

 

Tags

follow us