सभेच्या पोस्टरवर राहुल गांधींचा फोटो का नाही ? जयंत पाटलांनी स्पष्टचं सांगितले

  • Written By: Published:
सभेच्या पोस्टरवर राहुल गांधींचा फोटो का नाही ? जयंत पाटलांनी स्पष्टचं सांगितले

पुणेः महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आज छत्रपती संभाजीनगरला होत आहे. या सभेची जय्यत तयारी झालेली आहे. या सभेच्या पोस्टर आणि टीझरमधून काँग्रेसचे नेते राहुल गांधी मात्र गायब आहेत. त्यावरून वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबत राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना स्पष्टीकरण दिले आहे.

भोंदू बाबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गांधीजींना केले लक्ष्य, रोहित पवारांचा आरोप

जयंत पाटील म्हणाले, महाविकास आघाडीचीही सभा असून, सर्व पक्ष एकसंघ आहेत. महाराष्ट्रातील जनतेच्या सध्याच्या प्रश्नावर महाविकास आघाडीचे नेते बोलणार आहेत. या सभेतून महाविकास आघाडीचे वज्रमूठ दिसणार आहे. ही सभा राज्यातील नेत्यांची आहे. त्यामुळे राहुल गांधी यांचा फोटो पोस्टरवर लावण्यात आलेला नाही. या सभेत महाविकास आघाडीचे सर्व नेते बोलणार नाहीत. प्रत्येक पक्षातील प्रमुख एक नेत्याचे भाषण होईल. या सभास्थळी कार्यकर्त्यांना सर्व नेत्यांचे मात्र दर्शन होईल, असे पाटील म्हणालेत.

छ. संभाजीनगर : महाविकास आघाडीच्या सभेसाठी पोलिसांच्या अटी – शर्ती

छत्रपती संभाजीनगर येथे सावरकर गौरव यात्रा आणि महाविकास आघाडीची सभा एकाचवेळी होत आहे. त्याबद्दल पाटील म्हणाले, आमची सभाही वेगळ्या ठिकाणी आहे. सभास्थळी कार्यकर्ते येतील. सावरकर यात्रा ही दुसरीकडे निघणार आहे. ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी पोलिसांवर आहे. त्यामुळे पोलीस काळजी घेतील.

गिरीश बापट यांच्या कुटुंबियांची पाटील यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आहे. तर आमच्या पक्षामध्ये अजूनही पुणे लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झालेली नसल्याचे पाटील यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube