छ. संभाजीनगर : महाविकास आघाडीच्या सभेसाठी पोलिसांच्या अटी – शर्ती
छत्रपती संभाजीनगर : आज (दि.2) छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi)जाहीर सभा होणार आहे. सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर (Sanskrutik Mandal Ground)ही सभा सायंकाळी सहा वाजता होणार आहे. या सभेमध्ये महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकतच तणावग्रस्त वातावरण झालं होतं. त्यानंतर महाविकास आघाडीची पहिलीच बैठक ही छत्रपती संभाजीनगरमध्ये होत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष या सभेकडं लागलं आहे.
सभेसाठी परवानगी देताना पोलीस प्रशासनाकडून काही अटी घालण्यात आल्या आहेत…
अश्या असतील अटी – शर्ती
▪️ जाहीर सभा संध्याकाळी 5 ते रात्री 9.45 या वेळेतच घ्यावी.
▪️ कार्यक्रमाच्या वेळेत आणि ठिकाणामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करु नये.
▪️ आक्षेपार्ह्य घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन होणार नाही याची काळजी घ्यावी.
▪️ सभेला जाताना आणि येताना कर आणि बाईक रॅली काढू नये.
▪️ सभेसाठी आवश्यक असलेल्या शाकीय विभागाच्या परवानग्या घेण्यात याव्या.
▪️ सभेसाठी उभारण्यात आलेल्या स्टेजचे, ‘स्टेज स्टॅबिलिटी’ प्रमाणपत्र सादर करावे.
▪️ कार्यक्रमाच्या वेळी कोणताही रस्ता रहदारीसाठी बंद करण्यात येऊ नये.
▪️ वाहतुकीसाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, याची काळजी घ्यावी.
▪️ कार्यक्रमावेळी शस्र तलवारी वापरू नये, शस्र अधिनियमातील तरतुदीचा भंग करू नये
▪️ सभेसाठी आलेय वाहनांनी पोलिसांनी दिलेल्या मार्गानेच प्रवास करावा.