Sanjay Raut on Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Retirement) यांनी त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कार्यकर्ते जसे स्तब्ध झाले आहेत तसेच पक्षातील नेतेही स्तब्ध झाले आहेत.
त्यांच्या या निर्णयावर खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत भाष्य केले होते. शरद पवार यांच्या निर्णयाचा महाविकास आघाडीवर काहीच परिणाम होणार नाही, असे ते म्हणाले होते. त्यानंतर आज त्यांनी पुन्हा या मुद्द्यावर भाष्य केले.
Sanjay Shirsat : पवारानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अजित पवार हेच योग्य
ते म्हणाले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे काही दिवसांपासून अस्वस्थ असल्याचे दिसत होते. त्यांच्या मनातली अस्वस्थता जाणवत होती. त्यानंतर त्यांनी भाकरी फिरवण्याचे वक्तव्य केले पण तवाच फिरवला असे राऊत म्हणाले.
पवार यांनी फक्त राजीनामा दिला आहे. त्यांनी राजकारणातून संन्यास घेतलेला नाही. त्यामुळे आम्हाला ज्यावेळी गरज पडेल तेव्हा आम्ही त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांच्याकडे जाऊ. पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रात उद्धव ठाकरेंबाबतही भाष्य केले आहे. यावर मात्र राऊत यांनी जास्त बोलणे टाळले. ते म्हणाले, आत्मचरित्रात जास्त वैयक्तिक भूमिका असतात. त्या काही लोकांच्या नसतात. मी ते पुस्तक वाचलेले नाही. पुस्तक वाचल्यानंतर यावर सविस्तर बोलता येईल.
Ajit Pawar यांच्या राक्षसी स्वप्नापायी शिवसेना फुटली, रामदास कदमांचा गंभीर आरोप
उद्धव ठाकरेंबरोबर चर्चा केली
राज्यातील या मोठ्या घडामोडींबाबत चर्चा केली आहे. राज्यात ज्या काही घडामोडी घडल्या आहेत. यावर लवकरच सामना वृत्तपत्रात उद्धव ठाकरेंची प्रदीर्घ मुलाखत घेण्यात येणार आहेत. त्यावर सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे राऊत म्हणाले.