Uddhav Thackeray visit Raj Thackeray Ganpati: ठाकरे बंधू आज गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi) निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आले. गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) निमित्ताने आज मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सहकुटुंब गणपतीच्या दर्शनासाठी दाखल झाले. तब्बल दोन दशकांनंतर उद्धव ठाकरे प्रथमच राज ठाकरे यांच्या घरी गणपती दर्शनासाठी गेले. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
Ganeshotsav 2025 PHOTO : आपला राजा आला! लालबागच्या राजाचं मनमोहक रूप…
राज ठाकरे यांच्या घरी दरवर्षी दीड दिवसांचा गणपती विराजमान होतो. अनेक सिने कलाकार, राजकीय नेते मंडळी गणपती बाप्पाची पूजा करण्यासाठी राज ठाकरेंकडे जात असतात. यंदा राज यांनी उद्धव ठाकरेंना फोनवरून खास निमंत्रण दिलं होतं. या निमंत्रणाला उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानुसार उद्धव ठाकरे सकाळी 11 वाजता रश्मी ठाकरे, आदित्य आणि तेजस ठाकरे यांच्यासह ‘शिवतीर्थ’वर पोहोचले होते. यावेळी त्यांनी गणपती बाप्पाचं मनोभावे दर्शन घेतलं. उद्धव ठाकरे हे आज दुपारी राज ठाकरे यांच्या घरी जेवणार आहेत.
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात जरांगेंच्या मोर्चाची सुरुवात! Photo पाहिले का?
दरम्यान, शिवतीर्थवरील आजच्या दोन्ही ठाकरे बंधूमध्ये काही चर्चा होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे देखील संध्याकाळी गणपती दर्शनासाठी उपस्थित जाणार आहेत, अशी माहिती आहे.
याआधी मराठीच्या मुद्द्यावरून दोन्ही बंधू एकत्र येत विजयी मेळावा घेतला होता. त्यानंतर 27 जुलै रोजी राज ठाकरे उद्धव यांच्या वाढदिवसानिमित्त ‘मातोश्री’वर गेले होते. या दोन्ही भावांच्या गेल्या काही दिवसांपासून सातत्यने भेटी होत आहे. राजकीय वर्तुळात देखील आता दोन्ही ठाकरे बंधू युती करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, अद्याप तरी त्यांनी अधिकृत युतीची घोषणा केलेली नाही. परंतु, आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही नेते एकत्र येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.