मतदार याद्यांमध्ये घोळ, लक्ष द्या ; राज ठाकरेंचा बैठकीत पदाधिकाऱ्यांना कानमंत्र

मतदार याद्यांमध्ये घोळ, लक्ष द्या ; राज ठाकरेंचा बैठकीत पदाधिकाऱ्यांना कानमंत्र

Raj Thackeray : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. आज राज ठाकरे यांनी पुण्यात (Pune) कार्यकर्त्यांची बैठक घेत निवडणुकीसाठी तयारी लागण्याचे आदेश दिले आहे. तसेच मतदार याद्यांवर जो घोळ झालेला आहे त्या संदर्भात सर्वांनी लक्ष द्यावे असे आदेश देखील राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहे.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जो मत चोरी संदर्भात आवाज उठवला आहे त्याबाबत सर्वांनी आपल्या प्रभागात लक्ष देऊन मतदार यादींबाबत जनजागृती करा तसेच मतदार याद्यांवर सर्वांनी काम करावे असं देखील राज ठाकरे म्हणाले. तसेच यावेळी राज ठाकरे यांनी इच्छुक उमेदवारांचे फोटो देखील काढून घेतले. याच बरोबर 40 माणसामागे दोन बी एल ए नेमण्याचे आदेश कार्यकर्त्यांना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिले.

राज ठाकरेंना वाहतूक कोंडीचा फटका 

तर दुसरीकडे राज ठाकरे यांच्या कार्यक्रमाला पुण्यातील वाहतूक कोंडीचा फटका देखील बसला. कार्यक्रमाला जात असताना राज ठाकरे पुण्याच्या वाहतूक कोंडीत अडकले होते. बैठकीपूर्वी राज ठाकरे हे मनसे कार्यकर्ते प्रल्हाद गवळी यांच्या कार्यक्रमाला जात असताना वाहतूक कोंडीत अडकले होते. तर दुसरीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राज ठाकरे शिवसेना ठाकरे गटाशी युती करणार असल्याची चर्चा देखील सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Asia Cup 2025 : अखेर बाबर आशिया कप खेळणार, संघात मिळाली मोठी जबाबदारी 

मतचोरीचा आरोप

लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला मदत करण्यासाठी निवडणूक आयोगाने मतचोरी केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. तसेच यासाठी राहुल गांधी यांनी अनेक पुरावे सादर करत निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला होता.

मालवणी टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाविरोधात मुंबई काँग्रेस आक्रमक, सरकारला बांगड्यांचा आहेर

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या