Download App

.. तरच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वागत करू; शिंदे गटाच्या नेत्याचे मोठे विधान

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर देशभरातील राजकारण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादीतील एक गट भाजपा-शिंदे गटाबरोबर जाणार असल्याने शरद पवार यांनी राजीनामा दिल्याची चर्चा सुरू आहे.

या घडामोडींवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थोडा का होईना पण, अंतर्गत कलह आहे हे सर्वांना मान्य आहे. परंतु, शरद पवारांनी फार विचाराअंती हा निर्णय घेतला आहे. त्यांनी अलीकडेच भाकरी फिरवावी लागेत असे सांगितले. पण, त्यांनी त्याची सुरुवात स्वतःपासून केली हेच खरं मोठ्या नेत्यांचं वैशिष्ट्य असतं.

अंबादास दानवे म्हणाले, शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर संपूर्ण राष्ट्रवादीत एकजूट…

राष्ट्रवादी फुटेल किंवा त्यांच्यातील एक गट इकडे येईल असे मला तरी वाटत नाही. एक गट येऊन काय होणार आहे, पक्षात उभी फूट पाडण्याचा प्रयत्न अनेक जण करत आहेत. पण तसे होईल असे वाटत नाही. आलीच तर पूर्ण राष्ट्रवादी आमच्याबरोबर येईल, असे शिरसाट म्हणाले.

ते पुढे म्हणाले, तुम्हाला जर आमच्याबरोबर यायचेच असेल तर शिवसेना भाजप यांची विचारसरणी मान्य करावी लागेल. हे मान्य असेल तर तुम्ही नक्की आमच्याबरोबर या, आम्ही तुमचं स्वागतच करू, हीच आमची भूमिका आहे, असे शिरसाट म्हणाले.

अंतिम निर्णय बाकी, पण माझ्याकडून… शरद पवारांच्या राजीनाम्यावर ठाकरे बोलले

महाविकास आघाडी किमान समान कार्यक्रमावर तयार झाली होती. त्यांचा किमान समान कार्यक्रम वेगळा होता. मात्र आमचे तसे नाही. आमचा अजेंडा ठरलेला आहे. म्हणून ते जर आमच्या विचारांशी सहमत झाले तर आम्ही त्यांचे स्वागतच करू, असेही त्यांनी सांगितले.

Tags

follow us