अजितदादा भाजपात जाणार का ? ; आंबेडकर म्हणाले, पंधरा दिवसांत दोन स्फोट होणार

Prakash Ambedkar : राज्याच्या राजकारणात सध्या अजित पवार मुख्यमंत्री (Ajit Pawar) होणार का, ते भाजपात जाणार का, आणि सरकार कोसळणार का हे कळीचे प्रश्न मोठ्या प्रमाणात चर्चिले जात आहेत. या प्रश्नांवर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया येत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)यांनी मात्र या मुद्द्यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. आंबेडकर यांनी रविवारी […]

Prakash Ambedkar

Prakash Ambedkar

Prakash Ambedkar : राज्याच्या राजकारणात सध्या अजित पवार मुख्यमंत्री (Ajit Pawar) होणार का, ते भाजपात जाणार का, आणि सरकार कोसळणार का हे कळीचे प्रश्न मोठ्या प्रमाणात चर्चिले जात आहेत. या प्रश्नांवर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया येत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)यांनी मात्र या मुद्द्यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. आंबेडकर यांनी रविवारी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशातील गोळीबाराची घटना, महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा, महाराष्ट्र भूषण पुरस्कारांवरील वाद तसेच राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.

राज्यातील सरकार कोसळणार का, अजित पवार मुख्यमंत्री होणार का, तसेच ते भाजपात प्रवेश करणार का ?, असे थेट प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारले. त्यावर आंबेडकर म्हणाले, ‘पंधरा दिवसात बरेच मोठे राजकारण महाराष्ट्रात होईल. तेव्हा आपण पंधरा दिवसांची वाट पाहू या. पंधरा दिवस थांबा राजकारणात दोन बॉम्बस्फोट होणारच आहेत’, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

‘त्या’ घटनेची सखोल चौकशी व्हायला हवी! न्यायालय योग्य तो…

सत्यपाल मलिक यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. पुलवामा येथील हल्ल्याबाबतही सरकावर आरोप केले. या प्रकरणावर आंबेडकर यांनीही प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले, ‘याआधीही मी म्हणालो होतो की ज्या लॉरीला ब्लास्ट करण्यात आले त्या लॉरीला कोणतेही संरक्षण नव्हते. ही माहिती माझ्यासारख्या माणसाला मिळू शकते तर ती सरकारलाही मिळू शकते. कॉन्व्हॉय शक्यतो पंधरा वाहनांच्या पुढे नसतो येथे तर 80 वाहनांपर्यंत होता. मलिक म्हणतात त्याप्रमाणे या मुद्द्यावर राजनितीकरण करायचे होते. मग राजनितीकरणासाठीच जवानांचा बळी दिला गेला का ?, हा महत्वाचा प्रश्न आहे’, असे आंबेडकर म्हणाले.

Exit mobile version