‘त्या’ घटनेची सखोल चौकशी व्हायला हवी! न्यायालय योग्य तो…

‘त्या’ घटनेची सखोल चौकशी व्हायला हवी! न्यायालय योग्य तो…

Chhatrapati Sambhajiraje : उत्तर प्रदेशात कुख्यात गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद यांची मीडियासमोर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी स्वराज्य संघटनेचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे.

आधी गँगस्टर आणि नंतर राजकारणी झालेला अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद याला गोळ्या घालून ठार मारण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली असून उत्तर प्रदेशात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. मात्र, मीडियासमोरच दोघांना गोळ्या घालण्यात आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

Atiq Ahmadचे नाशिक कनेक्शन : भावाने मरण्यापूर्वी ज्याचे नाव घेतले तो गुड्डू अटक – Letsupp

या हत्याप्रकरणी अटक करण्यात आलेले तीन हल्लेखोर हे अट्टल गुन्हेगार आहेत. हमीरपूरचा सनी, कासगंजचा अरुण मौर्य आणि बांदा येथील लवलेश तिवारी या तिघांनाही अतिक अहमद आणि अशरफ अहमद या दोघा भावांची हत्या केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

लहानपणापासूनच या तिघांनी गुन्हेगारीच्या जगतात प्रवेश केला होता. खून, दरोडा यासह गंभीर गुन्ह्यात तिघेही तुरुंगात गेले आहेत. तुरुंगातच त्यांची मैत्री झाली. या तिघांना अतिक आणि अशरफची हत्या करून डॉन व्हायचे होते, अशी माहिती आता समोर येत आहे.

उत्तर प्रदेशच्या या घटनेवर छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, उत्तर प्रदेशातील त्या घटनेची सखोल चौकशी व्हायला हवी. कायदेशीर प्रकिया आहे, त्याबद्दल न्याय व्यवस्था योग्य तो निर्णय घेईल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube