Maharashtra Sadan scam Updates : कथित महाराष्ट्र सदन घोटाळा (Maharashtra Sadan scam) प्रकरणात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची डोकेदुखी वाढणार आहे. कारण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी (Anjali Damania) भुजबळांनी पुन्हा एकदा कोर्टात खचलं आहे.
केजरीवाल आणि सोरेन यांची अटक हा संविधानावर हल्ला; पवारांनी डागली मोदी सरकारवर तोफ
भुजबळांची महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. मात्र, या निर्णयाविरोधात दमानियांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. गेल्या दीड वर्षापासून या खटल्याच्या सुनावणीसाठी तारीख मिळत नव्हती. अखेर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड (Dhananjay Chandrachud)) यांनी हस्तक्षेप करत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले.
महाराष्ट्र सदन घोटाळा :
महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ यांना डिसचार्ज करण्यात आल होतं. या प्रकरणातील डिस्चार्जला आव्हान देणारे अपील गेली दिड वर्ष ऐकले जात नव्हते. ५ न्यायाधीशांनी ‘नॉट बिफोर मी’ असे म्हटले होते.
सर्वोच्च न्यायालयासमोर एक SLP करुन त्यावर ओरडी घेऊन, माननीय CJ… pic.twitter.com/mmaa8ELJjI
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) March 31, 2024
भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असतांना त्यांच्या कार्यकाळात देण्यात आलेल्या विविध कंत्राटांमधून भुजबळ कुटुंबीयांच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात रोखरक्कम लाच म्हणून मिळाल्याचा आरोप करण्यात आला होता. जवळपास १३ कोटी ५० लाख रुपयांची रक्कम भुजबळांना मिळाली, असा आरोप होता. महाराष्ट्र सदन आणि इंडिया बुल्स प्रकरणात, राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 11 जून 2015 रोजी स्वतंत्र गुन्हे दाखल केल्यानंतर, ईडीने 15 जून 2015 रोजी काळा पैसा प्रतिबंधक कायद्यांतर्गत भुजबळांवर दोन गुन्हे दाखल केले होते.
Pakistan : सरकारी कार्यक्रमात ‘रेड कार्पेट’ बंद; खर्च कमी करण्यासाठी पाकिस्तानचा निर्णय
दरम्यान, भुजबळ यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) न्यायालयात दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केला होता. छगन भुजबळ यांच्यासोबत त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांनीही हा अर्ज दाखल केला आहे. आपल्यावर करण्यात आलेले आरोप हे निराधार आहे. त्यामुळ आपल्याला दोषमुक्त करावे, असं भजुबळांनी म्हटलं होतं. त्यानंतर न्यायालयाने भुजबळांची निर्दोष मुक्तता केली होती. यानंतर अंजली दमानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
आता अंजली दमानीया यांनी एक्सपवर पोस्ट केली. त्यात त्यांनी लिहिलं की, महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ यांना डिसचार्ज करण्यात आल होतं. या प्रकरणातील डिस्चार्जला आव्हान देणारे अपील गेली दिड वर्ष ऐकले जात नव्हते. ५ न्यायाधीशांनी ‘नॉट बिफोर मी’ असे म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयासमोर एक SLP करुन त्यावर ओरडी घेऊन, माननीय CJ ह्यांना योग्य न्यायाधीशांसमोर त्याची लिस्टिंग करण्यासाठी विनंती करण्याचे आदेश मिळाले. शेवटी प्रकरण उद्या अनुक्रमांक 12 वर न्यायमूर्ती मोडक यांच्यासमोर ठेवण्यात आले आह
म्हणजेच उद्या (1 एप्रिल) न्यायमूर्ती मोडक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणाची पुन्हा सुनावणी होणार आहे. या सुनावणीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. छगन भुजबळांना दिलेली क्लीन चिट कायम राहते की न्यायालय त्यांना पुन्हा दोषी ठरवते हेच पाहणं महत्वाचं आहे.