Sangli Lok Sabha Election : महाविकास आघाडीत सांगली लोकसभा मतदारसंघावरून (Sangli Lok Sabha Election) तिढा निर्माण झाला आहे. ठाकरे गटाने या मतदारसंघात काँग्रेसच्या नाकावर टिच्चून (Congress Party) थेट उमेदवार जाहीर केला. ठाकरे गटाची ही खेळी काँग्रेस नेत्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. त्यांच्याकडून सांगली मतदारसंघ पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. पलूस कडेगावचे आमदार विश्वजीत कदम यांनी सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव केसी वेणुगोपाल यांची भेट घेतली. या जागेसाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न करावेत अशी मागणी केली. या मतदारसंघात काँग्रेसकडून विशाल पाटील निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यांना स्थानिक काँग्रेस नेत्यांचाही पाठिंबा आहे.
सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस किती आग्रही आहे याचा अंदाज यावरून येतो. मात्र, उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) कालच पत्रकार परिषदेत काँग्रेसला धक्का देणारे वक्तव्य केले होते. काँग्रेसने आता सांगलीत आमच्या उमेदवाराचा प्रचार करावा असे वक्तव्य ठाकरे यांनी केले होते. त्यानंतर आज खासदार संजय राऊत यांनीही (Sanjay Raut) काँग्रेसला डिवचणारे वक्तव्य केले आहे.
Letsupp Special : नाही मशाल, फक्त विशाल : उद्धव ठाकरेंसाठी सांगली भूंकपाचे केंद्र
सांगलीचा उमेदवार दिला, बदलणार नाही : राऊत
आमचा उमेदवारच सांगलीची जागा लढणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवार जाहीर केला आहे. आता येथे वेगळी भूमिका घेऊन उमेदवारी मागे घेतली जाण्याची शक्यता आजिबात नाही. तुम्ही विचाराल की यातून काय मार्ग काढणार. त्यावर मी सांगतो की आम्ही आधीच मार्ग काढला आहे. तो काय मार्ग आहे याबाबत तुम्हाला लवकरच कळवू.
राऊत पुढे म्हणाले, मी आणि शिवसेनेची मुंबईतली एक टीम उद्या सांगलीला जात आहे. आदित्य शिरोडकर यांना तिथे समन्वयक म्हणून नेमले आहे. आम्ही सांगलीत जाऊन ठाण मांडून बसणार आहोत. तीन ते चार दिवस मी सांगलीच्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रात फिरणार आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांनाही भेटणार आहे.
“संजय राऊत कितना झूठ बोलोगे?” ‘त्या’ बैठकीचा उल्लेख करत आंबेडकरांचा हल्लाबोल