Kunal Raut हटाव मोहिम; युवक काँग्रेसच्या बैठकीत तुफान राडा, खुर्च्यांची फेकाफेकी

Maharashtra Youth Congress :  युवक काँग्रेसमधील अंतर्गत वाद (Maharashtra Youth Congress) चव्हाट्यावर आला आहे. या बैठकीत कार्यकर्त्यांत तुफान हाणामारी झाला. एकमेकांच्या अंगावर खुर्च्या फेकल्या गेल्या त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत मिळालेली माहिती अशी, या बैठकीत कार्यकर्त्यांनी एकमेकांवर खुर्च्यांची फेकाफेक केली. युवक अध्यक्ष कुणाल राऊत यांच्याविरोधात काही कार्यकर्ते भिडले. शिवराज मोरे या […]

Kunal Raut

Kunal Raut

Maharashtra Youth Congress :  युवक काँग्रेसमधील अंतर्गत वाद (Maharashtra Youth Congress) चव्हाट्यावर आला आहे. या बैठकीत कार्यकर्त्यांत तुफान हाणामारी झाला. एकमेकांच्या अंगावर खुर्च्या फेकल्या गेल्या त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत मिळालेली माहिती अशी, या बैठकीत कार्यकर्त्यांनी एकमेकांवर खुर्च्यांची फेकाफेक केली. युवक अध्यक्ष कुणाल राऊत यांच्याविरोधात काही कार्यकर्ते भिडले. शिवराज मोरे या गटाने कुणाल राऊत यांचा विरोध केला.

महाविकास आघाडीचं जागावाटप कसं होणार? अजितदादांनी दिला महत्वाचा अपडेट

कुणाल राऊत यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करण्यात आली. युवक काँग्रेसच्या चार उपाध्यक्षांनी कुणाल राऊत यांना महाराष्ट्र अध्यक्षपदावरून बदलण्याची मागणी केली. यानंतर बैठकीत तणाव निर्माण झाल्याचे दिसले. कार्यकर्ते आक्रमक झाले. एकमेकांवर खुर्च्या फेकल्या. त्यामुळे बैठकीत तणाव निर्माण झाला होता. या घटनेची माहिती सर्वत्र पसरली. त्यानंतर आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते या राड्याची कशी दखल घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, या संघर्षावर आ. बाळासाहेब थोरात यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. थोरात म्हणाले, युवक काँग्रेस आहे. तिथे तरूण मुले आहेत. तरुण मुलांचा उत्साह असतो. युवक काँग्रेस ही एक लढाऊ संघटना आहे. कधी कधी त्यांच्यातही संघर्ष होतो ते काही नाकारता येत नाही. परंतु, या संघर्षातून ते धडा घेत असतात आणि त्यातूनच नवीन नेतृत्व घडत असते ही वस्तुस्थिती आहे.

Exit mobile version