Download App

नाना पटोले, धनंजय मुंडे, रामराजे नाईक निंबाळकर, रवींद्र धंगेकर लागले खासदारकीच्या तयारीला!

मुंबई : महाविकास आघाडीचे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी संभाव्य जागा वाटप ठरलं आहे का? असा सवाल सध्या विचारला जात आहे. यासंबंधीची एक यादी सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होतं आहे. या यादीत काँग्रेस १६, राष्ट्रवादीला १५, आणि ठाकरे गटाला १३, जागा देण्यात आल्याचं दिसून येत आहे. याशिवाय या यादीत राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्षाला १ जागा, हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला १ जागा, तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना २ जागा दिल्याचा उल्लेख आहे.

मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या लोकसभा निवडणुकीच्या जागावाटप मुद्द्यावरुन प्रचंड चर्चा सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांची ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी बैठक झाली. यात आगामी लोकसभेसाठी 16-16-16 चा फॉर्म्युला ठरवण्यात आल्याचे सांगण्यात येत होते.

मात्र, शिवसेना नेते (UBT) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना 19 जागांवर लोकसभा निवडणूक लढवेल, असा दावा केला. संजय राऊत यांच्या या दाव्यावर काँग्रेस आणि  वारंवार सांगत आहेत. त्यामुळे आगामी काळात जागा वाटपावरून मविआ बिघाडी निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र ही यादी समाज माध्यमांमधून व्हायरल झाल्यानंतर महाविकास आघाडीचे संभाव्य जागावाटप ठरले आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

कोणता पक्ष लोकसभेच्या कोणत्या मतदारसंघातून उमेदवार देणार, याची एक यादीही आता समोर आली.

काँग्रेस :

नंदुरबार – के. सी. पाडवी (काँग्रेस)
धुळे – कुणाल पाटील (काँग्रेस)
वर्धा – रणजित कांबळे (काँग्रेस)
रामटेक – नितीन राऊत (काँग्रेस)
नागपूर- नाना पटोले (काँग्रेस)
हिंगोली- प्रज्ञा सातव (काँग्रेस)
जालना – कल्याण काळे (काँग्रेस)
नांदेड – अशोक चव्हाण (काँग्रेस)
लातूर – मच्छिंद्र कामत (काँग्रेस)
सोलापूर – प्रणिती शिंदे (काँग्रेस)
भिवंडी – सुरेश टवर (काँग्रेस)
मुंबई उत्तर – संजय निरुपम (काँग्रेस)
मुंबई उत्तर मध्य – प्रिया दत्त (काँग्रेस)
पुणे – रवींद्र धंगेकर (काँग्रेस)
सांगली – विश्वजीत कदम (काँग्रेस)
चंद्रपूर – बाळू धानोरकर (काँग्रेस)
—————————————

जळगाव – गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी)
रावेर – एकनाथ खडसे (राष्ट्रवादी)
गडचिरोली – धर्मरावबाबा आत्राम (राष्ट्रवादी)
गोंदिया – प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी)
बीड – धनंजय मुंडे (राष्ट्रवादी)
दिंडोरी – नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी)
नाशिक – छगन भुजबळ (राष्ट्रवादी)
कल्याण – आनंद परांजपे (राष्ट्रवादी)
रायगड – सुनील तटकरे (राष्ट्रवादी)
मावळ – पार्थ पवार (राष्ट्रवादी)
बारामती – सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)
शिरूर – अमोल कोल्हे (राष्ट्रवादी)
अहमदनगर – नीलेश लंके (राष्ट्रवादी)
माढा – संजय शिंदे (राष्ट्रवादी)
सातारा – रामराजे निंबाळकर (राष्ट्रवादी)
———————————-

बुलढाणा – नरेंद्र खेडेकर (शिवसेना-ठाकरे गट)
अमरावती – दिनेश बूब (शिवसेना-ठाकरे गट)
यवतमाळ – संजय देशमुख (शिवसेना-ठाकरे गट)
संभाजीनगर – अंबादास दानवे (शिवसेना-ठाकरे गट)
धाराशिव – ओमराजे निंबाळकर (शिवसेना-ठाकरे गट)
ठाणे – राजन विचारे (शिवसेना ठाकरे गट)
मुंबई उत्तर पश्चिम – अमोल कीर्तिकर (शिवसेना-ठाकरे गट)
मुंबई ईशान्य – संजय दिना पाटील (शिवसेना-ठाकरे गट)
मुंबई दक्षिण – अरविंद सावंत (शिवसेना-ठाकरे गट)
शिर्डी – बबनराव घोलप (शिवसेना-ठाकरे गट)
रत्नागिरी – विनायक राऊत (शिवसेना-ठाकरे गट)
परभणी – संजय जाधव (शिवसेना – ठाकरे गट)
कोल्हापूर – संजय पवार (शिवसेना-ठाकरे गट)

———————————-
अकोला- सुनील फाटकर (वंचित बहुजन आघाडी)
पालघर – बळीराम जाधव (बहुजन विकास आघाडी)
मुंबई दक्षिण मध्य – प्रकाश आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी)
हातकणंगले – राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना)

मित्रपक्षांना जागा राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कोट्यातून?

दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना (UBT) गटाला प्रत्येकी १६ जागा आल्याचे दिसून येत आहे. त्यातील राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्षाला १ जागा, हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला १ जागा, तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना २ जागा राष्ट्रवादी आणि शिवसेना (UBT) या पक्षांच्या कोट्यातून दिलेल्या दिसून येत आहे.

Tags

follow us