Download App

‘मविआ’चच सरकार? उद्धव ठाकरे अन् शरद पवारांनी ‘लाईव्ह शस्त्र’ उगारलं, उमेदवारांना कडक सूचना

महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी उमेदवारांची ऑनलाईन बैठक घेत विजयानंतर प्रमाणपत्र घेऊन मुंबई गाठण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Maharashtra Assembly Election : राज्यात विधानसभेसाठी (Assembly Election) मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून पुढची सत्ता स्थापन करण्याची तयारी सुरु झाल्याचं दिसून येत आहे. एवढंच नाही तर राज्यात महाविकास आघाडीचंच सरकार येणार असून निवडणुकीच्या निकालानंतर उमेदवारांनी प्रमाणपत्र घेऊन थेट मुंबई गाठण्याच्या सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी ऑनलाईन बैठकीत दिल्या आहेत. तर दुसरीकडे नाना पटोलेंनी (Nana Patole) आम्हीच सरकार स्थापन करणार असल्याचा विश्वास व्यक्त केलायं. तसेच विजयानंतरची रणनीती उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांना सांगितलीयं.

धक्कादायक! एमआयडीसीतील कंपनीत वायू गळती, दोघांचा मृत्यू; 10 जण गंभीर

निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात दगाफटका होऊ नये, यासाठी शरद पवार यांनी सर्वच उमेदवारांची ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीत शरद पवार यांनी निकाल लागल्यानंतर उमेदवारांनी प्रमाणपत्र घेऊन थेट मुंबईत यायचं, अशा सूचना दिल्या, तर विजयानंतर उमेदवारांनी कोणत्या ठिकाणी एकत्र यायचंय, याबाबत उद्धव ठाकरे यांच्याकडून सूचना देण्यात आल्या आहेत. शरद पवार यांच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांंच्यासह खासदार सुप्रिया सुळे यांनीही उमेदवारांना मार्गदर्शन केलंय. दगाफटका होऊ नये, म्हणून उमेदवारांनी गाफिल राहु नये, असंही सांगण्यात आलंय.

राज्यात 20 नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडली असून सर्वच पक्षांच्या उमेदवारांचं भविष्य ईव्हीएम मशीनमध्ये कैद झालंय. उद्या 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. मतमोजणीच्या आधीच महाविकास आघाडीकडून विजयानंतर उमेदवारांनी काय करावं, याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहे. महाविकास आघाडीच्या 157 जागा निवडून येणार असून कोणत्याही प्रकारची काळजी करु नये, असाही विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून यावेळी व्यक्त करण्यात आलायं.

ब्रेकअपमुळे बलात्काराचा गुन्हा दाखल करता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

उद्धव ठाकरेंकडून ‘प्लॅन बी’ तयार :
निवडणुकीच्या निकालांतर कोणताही दगाफटका होऊ नये, यासाठी उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उमेदवारांशी चर्चा केलीयं. या चर्चेत उद्धव ठाकरे यांनी सर्व विजयी उमेदवारांनी एकत्रित कुठे जमावे आणि काय करावे? या संदर्भात उद्धव ठाकरेंनी या बैठकीत मार्गदर्शन केलंय.यामध्ये उद्धव ठाकरेंनी प्लॅन बी करत उमेदवारांसोबत लाईव्हच्या माध्यमातून संपर्क साधलायं. निकालानंतर इतर राजकीय पक्षांशी संपर्क होऊ नये, यासाठी उद्धव ठाकरेंनी प्लॅन बी तयार केलायं.

उद्या संध्याकाळी आम्ही सत्ता स्थापन करणार…
मतमोजणीनंतर उद्या संध्याकाळीच आम्ही सत्तास्थापन करण्याचा प्रयत्न करणार असून वेळ कमी असल्याने, इतर जुळजुळवी करावी लागणार आहे. महाविकास आघाडीलाच बहुमत मिळणार असून अपक्षांसह बंडखोर उमेदवारांच्या आम्ही संपर्कात असल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलंय.

follow us