Download App

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला: केवळ अंतिम शिक्कामोर्तब बाकी, सुप्रिया सुळे यांचा दावा

  • Written By: Last Updated:

Mahavikas Aghadi : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी देशभरातील सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. जागा वाटपासाठी अनेक पक्षांनी वाटाघाटी सुरुवात केली आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीमध्ये जागावाटपावर चर्चा करण्यासाठी बैठका सुरू आहेत. राज्यातील 48 लोकसभेच्या जागांपैकी ठाकरे गटाने 23 जागांवर दावा केला आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या की लोकसभेचा जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे. फक्त शिक्कामोर्तब होणे बाकी आहे.

जागावाटपाबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, 15 दिवसांपूर्वी दिल्लीत सोनिया गांधी, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची बैठक झाली. त्या बैठकीत जागावाटपाबाबत अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. पुढच्या 8-10 दिवसांत अधिकृरित्या जाहीर केलं जाईल.

जागावाटपावर चर्चा
महायुती आणि महाविकास आघाडीवरच्या जागावाटपावर राज्यात चर्चा सुरू आहे. राज्यातील लोकसभेच्या 48 जागा आहेत. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) हे तीन प्रमुख पक्ष महायुतीत आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) हे तीन प्रमुख पक्षांची आघाडी आहे. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी होण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप अधिकृत निर्णय झालेला नाही.

आधी लगीन आमच्या आमदारकीचे… मग तुमच्या महापालिकेचे : कर्डिलेंचे माजी नगरसेवकांना आवाहन

दरम्यान, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही यावर भाष्य केले आहे. पाटील म्हणाले, जागावाटपाचे चित्र येत्या एक-दोन दिवसांत स्पष्ट होईल. दिल्लीत तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली आहे. दिल्लीत काँग्रेस पक्षाच्या काही बैठका झाल्याचं मी ऐकलं आहे. मला आशा आहे की तिन्ही पक्ष पुन्हा एकदा एकत्र बसतील आणि या आठवडाभरात सर्व गोष्टींवर निर्णय होईल.

follow us