आधी लगीन आमच्या आमदारकीचे… मग तुमच्या महापालिकेचे : कर्डिलेंचे माजी नगरसेवकांना आवाहन

आधी लगीन आमच्या आमदारकीचे… मग तुमच्या महापालिकेचे : कर्डिलेंचे माजी नगरसेवकांना आवाहन

अहमदनगर : महापालिकेचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे सध्या तरी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होईपर्यंत महापालिका निवडणुकीचा विचार करू नका. आता आधी आमच्या आमदारकीच्या निवडणुकीकडे लक्ष द्या, मग आम्ही तुम्हाला मदत करु, असे आवाहन करत माजी आमदार, भाजप (BJP) नेते शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) यांनी माजी नगरसेवकांना येत्या विधानसभा निवडणुकीतील विजयसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. (BJP leader Shivaji Kardile appealed to the former corporators to strive for victory in the upcoming assembly elections.)

नुकतेच एका कार्यक्रमादरम्यान मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पुढच्या दोन महिन्यात लोकसभेच्या तर सात महिन्यात राज्य विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर पुढारी मंडळी आता तयारीला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीला वेळ असला तरीही आमदारकीसाठी इच्छुक नेतेमंडळी आतापासूनच प्रचाराला लागले आहेत. पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून निवडणुकीची गणित आखात आहे.

फुकटचे श्रेय घेण्यासाठी नगरचे पुढारी अवतरले; तनपुरेंचा कर्डिलेंवर हल्लाबोल

काय म्हणाले शिवाजी कर्डिले?

यावेळी बोलताना कर्डिले म्हणाले, राजकारण करीत असताना त्याच्या पलीकडे जाऊन जनतेची कामे करा, विकास कामांमध्ये पक्षीय राजकारण बाजूला ठेवून जनतेचे प्रश्न मार्गी लावा, राजकारणात सत्तेवर जायचे असेल तर स्वतःचे कर्तव्य सिद्ध करावे लागते, त्यातून जनतेचा विश्वास संपादन होतो.

नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी भीषण अपघात, कार अनियंत्रित होऊन डिव्हायडरला आदळली, सहा जणांचा मृत्यू

अहमदनगर महापालिकेवर आता प्रशासक राज आहे. नगरसेवक पदाचा कार्यकाळ संपला आहे, आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होईपर्यंत महापालिका निवडणुकीचा विचार करू नका, आमच्या आमदारकीच्या निवडणुकीकडे लक्ष द्या, मगच आम्ही तुम्हाला मदत करू असे साकडेही यावेळी कर्डिले यांनी नगरसेवकांना घातले.

शिवाजी कर्डिले यांचा 2019 च्या निवडणुकीत दारुण पराभव झाला होता. राष्ट्रवादीच्या प्राजक्त तनपुरे यांनी कर्डिलेंचा 22 हजार मतांनी पराभव केला होता. मात्र आता आगामी विधानसभा निवडणुकाकांच्या अनुषंगाने कर्डिले पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झाले आहे. अनेकवेळा ते सुजय विखे यांच्यासोबत कार्यक्रमामध्ये उपस्थित असतात. यावेळी मंचावरून ते प्रचार आणि टीका-टिपण्णी करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube