नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी भीषण अपघात, कार अनियंत्रित होऊन डिव्हायडरला आदळली, सहा जणांचा मृत्यू
Accident News : आज संपूर्ण जगभरात नववर्षाचे (New Year) जल्लोषात स्वागत केलं जातं असतांनाच झारखंडमध्ये (Jharkhand Accident) भल्या पहाटे एक भीषण दुर्घटना घडली. एका भीषण रस्ता अपघातात सहा मित्रांचा मृत्यू झाला. झारखंडमधील बिस्तुपूर पोलीस स्टेशन परिसरातील सर्किट हाऊस परिसरात ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
John Abraham: जॉन अब्राहमने खरेदी केला मुंबईत कोट्यवधींचा बंगला, किंमत ऐकून बसेल धक्का
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे पाच वाजता सूरज नावाच्या तरुणाच्या गाडीतून काही पार्टी करून घरी परतत होते. ही कार सुरज चालवत होता. मात्र, भरधाव वेगाने असलेल्या कारवरील सुरजचे नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटताच कार पहिल्यांदा डिव्हायरला धडकली आणि नंतर एका झाडावर आदळून उलटली. या कार दुर्घटनेत कारमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, याचा आवाज खूप दूरपर्यंत एकू आल्यानं लोक घरातून बाहेर धावत आले.
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हादरा! पश्चिम जपानला 7.5 रिश्टर स्केलचा भूकंप; मोठ्या त्सुनामीचा इशारा
मृत तरुणाचे वय 25 ते 30 वर्षांच्या दरम्यान असल्याचं सांगण्यात येत आहे. आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास हा काळजाचा ठोका चुकणवारा दुर्दैवी अपघात झाला. छोटू यादव, हेमंत कुमार, सूरज कुमार, मोनू महतो, शुभम कुमार अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत. आणखी एकाची ओळख पटवली जात आहे.
स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली, त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवून जखमींना बाहेर काढले. सर्व जखमींना जमशेदपूरच्या टाटा मुख्य हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांकडून हे तरुण कुठे पार्टी करण्यासाठी गेले होते, याचा शोध घेतला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे तरुण नवीन वर्षाची पार्टी करून घरी परतत असताना ही घटना घडली. वृत्तानुसार, कारमधील सर्व तरुण दारूच्या नशेत होते. हा अपघात होताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, कारमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली. सर्व मृत तरुण आरआयटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुलुपांग येथील रहिवासी आहेत.
या अपघातात जखमी झालेल्या रविशंकरचे याचे वडील सुनील झा यांनी सांगितले की, अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला मात्र त्यांचा मुलगा वाचला. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त वाहनात आठ जण होते. त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला असून दोन जण वाचले आहेत.