Download App

BJPचं ऑपरेशन कमळ; महाविकास आघाडीचे काही खासदार संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचा दावा

  • Written By: Last Updated:

BJP Operation Lotus Maharashtra Politics : राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला (Mahayuti) मोठं यश मिळालं तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसलाय. त्यानंतर आता भारतीय जनता पक्ष (BJP) महाविकास आघाडीला पुन्हा मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्रात लवकरच भाजपचं मिशन कमळ असणार आहे, अशी चर्चा सुरू आहे.

गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स; छाया कदमच्या ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’ला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक श्रेणीमध्ये नामांकन!

महाविकास आघाडीचे काही खासदार भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे. भाजपच्या वरिष्ठ लोकांनी हा दावा केलाय. लवकरच हे खासदार भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती (Maharashtra Politics) मिळतेय. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या खासदारांमध्ये अस्वस्थता आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला घरचा आहेर; संजय राऊतांच्या सख्ख्या भावाची फेसबूक पोस्टद्वारे थेट टीका

यामुळे महाराष्ट्रात पुढच्या काळात भाजपचं ऑपरेशन कमळ (BJP Operation Lotus) असेल, अशी चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीचे नेमके कोणते खासदार भाजपच्या संपर्कात आहेत, हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपची पिछेहाट झाली होती, त्याच पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजपकडून हा नवा डाव टाकण्यात येतोय.

महाविकास आघाडीतील काही खासदार संपर्कात असल्याचा दावा भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने केलाय. महाविकास आघाडीचे हे खासदार काही दिवसांतच राजीनामा देतील, असं देखील या नेत्याने म्हटलंय. त्यासोबतच महाविकास आघाडीतील इतर नेत्यांमध्ये देखील अस्वस्थता असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर आगामी काळात भाजपकडून ऑपरेशन लोटस राबवण्यात येत असल्याची चर्चा आहे. आता महाविकास आघाडीत ज्या काही नवीन हालचाली सुरू आहेत, अशातच महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जातोय.

भाजप आता कोणते नवनवीन प्रयोग महाराष्ट्रात करणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. राज्यात आता भाजप ऑपरेशन लोटस कसं राबवणार, याकडे देखील संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. विधानसभेतील पराभवानंतर महाविकास आघाडीतील काही खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाच्या बड्या नेत्याने केलाय. 2019 पेक्षा मोठा राजकीय भूकंप महाराष्ट्रात येण्याची शक्यता वर्तवली जातेय.

 

follow us