Download App

महाविकास आघाडीत चौथा भिडू? इम्तियाज जलील यांच्याकडून युतीची ऑफर

महाविकास आघाडी देईल तेवढ्या जागांवर आम्ही निवडणुका लढवण्यास तयार, अशी खुली ऑफर एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला दिलीयं. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते.

Imtiaz Jaleel : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय. सर्वच पक्षाच्या नेत्यांकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. अशातच आता महाविकास आघाडीमध्ये चौथा भिडू सामिल होणार असल्याचं दिसून येत आहे. एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी महाविकास आघाडीला खुली ऑफर दिलीयं. तुम्ही द्याल तेवढ्या जागा आम्ही विधानसभा निवडणुकीत लढवू, त्याचा तुम्हालाच फायदा होणार आहे, नंतर एमआयएममुळे पडलो असल्याचं म्हणू नका, अशी खुली ऑफर जलील यांनी दिलीयं. छत्रपती संभाजीनगरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

अर्शद नदीम करणार पाकिस्तान क्रिकेट संघात एन्ट्री, बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत दिसणार ॲक्शनमध्ये?

जलील म्हणाले, राज्यातील एकूण 30 विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याबाबत एमआयएमचा विचार सुरु असून माझी कुठल्याही मतदारसंघात लढायला तयार आहे. लोकसभा निवडणुकीत माझा जरांगे फॅक्टरमुळे पराभव झाला आहे. आता विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत एमआयएम सामिल झाल्यास महाविकास आघाडीला फायदा होईल. महाविकास आघाडी जेवढ्या जागा आम्हाला देतील तेवढ्या आम्ही लढवण्यास तयार आहोत, निवडणुकीनंतर एमआयएममुळे पडलो असल्याचं म्हणू नका, असं इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केलंय.

तसेच मी कुठल्याही पक्षात प्रवेश करणार नाही, मी एमआयएम पक्ष आणि ओवेसी यांना सोडून कुठे जाणार नाही. मला ओवेसी यांनी संधी दिली आहे, त्यामुळे पक्ष सोडणार नाही. सध्या आमच्या पक्षाचा सर्वे सुरु आहे, त्यानुसार विधानसभेला तिकीट दिले जाईल. आमची बैठक होऊन मोठा निर्णय घेणार आहे, अनेक नेत्यांसोबत चर्चा सुरु आहे. नवीन टीम तयार झाली पाहिजे. सध्या महाराष्ट्रातील राजकारणाला लोक वैतागले असल्याचंही ते म्हणाले आहेत.

कमल हसनच्या ‘इंडियन 2’ बाबत नवीन माहिती आली समोर, हिंदी प्रेक्षकांसाठी असणार खास सरप्राइज

मी शरद पवारांना भेटलो नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसला मुस्लिमांनी मतदान केले
तीन वर्षात मुस्लिम मुक्त विधानपरिषद करण्यात आली. संभाजीनगर शहरात पूर्व आणि मध्य आमच्या मतदारांची संख्या आहे. राजकारणात आता विचार राहिले नाही. आमची ताकद इतकी मोठी तुमचे उमेदवार पडू शकतात. एकनाथ शिंदे साहेबांनी इतक्या स्कीम्स आणल्या मग ते एकटे का लढू शकत नाही. शरद पवारांना राजकारणातील एवढा अनुभव आहे, मग एकटे का लढत नाही? असा थेट सवाल जलील यांनी केलायं.

पोलिसांनी नितेश राणेंच्या थोबाडीत मारली पाहिजे…
भाजपचे आमदार नितेश राणे यांना इतके महत्व देऊ नका, सकाळी उठल्यापासून आम्ही हिंदू, आम्ही हिंदू म्हणतात. हिंदू फक्त तुम्हीच आहात बाकी कोणी नाही का? पोलिसांनी त्यांच्या थोबाडीत मारली पाहिजे, हे समाजकंटक सगळ्या जातीत आहेत, अशी खोचक टीका जलील यांनी राणेंवर केलीयं.

follow us