Download App

महायुतीच्या योजनांमुळेच गोरगरिबांचं उत्पन्न वाढलं; संभाजीराव पाटील निलंगेकर

  • Written By: Last Updated:

Sambhajirao Patil Nilangekar Ashirwad Yatra : निलंगा (Nilanga) मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार माजीमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांची आशीर्वाद यात्रा सध्या सुरू आहे. महायुती सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून शेतकरी आणि गोरगरिबांचे उत्पन्न वाढविण्याचे काम केलंय. या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावलं, असं प्रतिपादन निलंगा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार माजीमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर (Sambhajirao Patil Nilangekar) यांनी केलंय. आमदार निलंगेकर यांची आशीर्वाद यात्रा मतदारसंघात सुरू आहे. या यात्रेअंतर्गत आमदार निलंगेकर यांनी सोमवारी पान चिंचोली, शिरोळ (वां), खडक उमरगा, (Assembly Election 2024) डांगेवाडी, माचरटवाडी, शेंद, सावनगिरा, बोटकुळ, शिऊर, झरी, लांबोटा या गावांना भेटी देत तेथील नागरिक आणि मतदारांशी संपर्क साधला.

यावेळी तालुकाध्यक्ष कुमोद लोभे, बाजार समितीचे संचालक राहुल पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष धम्मानंद काळे, रिपाई आठवले गटाचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुश ढेरे, भाजपा संघटन सरचिटणीस संजय दोरवे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील, विक्रम पाटील, अशोक शिंदे, विजय कुलकर्णी, काकासाहेब जाधव,जनार्दन पाटील, गुंडेराव जाधव, बाबुराव जाधव, विलास पाटील, अविनाश पाटील यांसह मान्यवरांची त्यांच्यासमवेत उपस्थिती होती.

प्रतिक्षा संपली! पुष्पा 2 चित्रपटाचा ट्रेलर लवकरच चाहत्यांच्या भेटीला, ‘या’ दिवशी होणार लॉन्च

यावेळी बोलताना आमदार निलंगेकर म्हणाले की, महायुती सरकारने राज्यात विकासाच्या योजना मोठ्या प्रमाणावर राबवल्या. केवळ विकासकामे करूनच सरकार थांबले नाही, तर प्रत्येक कुटुंबाला आर्थिक बळ देण्यासाठी सरकारने काम केले. लाडकी बहीण योजना, शेतकरी सन्मान निधी यासारख्या योजनातून शेतकरी आणि गोरगरीब कुटुंबांचे उत्पन्न वाढविण्याचे काम केले. शेतकऱ्यांना वीज बिल माफी दिली. एक रुपयात पीक विमा योजना आणि उज्वला गॅस योजनाही दिली. आरोग्यासाठी मोफत उपचार उपलब्ध करून दिले. आता शासनाने लाडकी बहीण योजनेचा निधी 2100 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना कायमस्वरूपी मोफत वीज दिली जाणार आहे. महिला बचत गटांना मिळणारा निधी दुप्पट करण्यात आला आहे, असं ते म्हणाले आहेत.

दिलीप वळसे पाटील साहेबांनी आम्हाला मोठं केलंय, तालुक्याचा विकास केलाय ; विष्णू काका हिंगे

आमदार निलंगेकर यांनी सांगितलं की, सरकारने प्रत्येक कुटुंबाला डोळ्यासमोर ठेवत योजनांची आखणी केली. घरातील प्रत्येक सदस्याचा विचार केला. रोजगार निर्मिती केली. शिक्षणासाठी सुविधा दिल्या. यातून प्रत्येक कुटुंबाला काही ना काही मिळाले. यामुळे कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत झाली. सर्वसामान्य लोकांच्या जीवनाचा स्तर उंचावला असल्याचंही आमदार निलंगेकर म्हणाले.

आ.निलंगेकर यांच्या आशीर्वाद यात्रेस ठिकठिकाणी प्रचंड पाठिंबा मिळत आहे. गावोगाव शेकडो नागरिक या यात्रेत सहभागी होत आहेत. ठिकठिकाणी आ.निलंगेकर यांचे स्वागत केले जात असून ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवकांकडून निवडणुकीतील विजयासाठी आ.निलंगेकर यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. यावेळी काकासाहेब जाधव, जनार्दन पाटील,दिलीप पाटील, विकास पाटील,शिवाजी जाधव, नरसिंग पाटील, जनार्दन हनमंते, मधुकर जाधव, गणेश वडगावे, अंजनाताई जाधव, उमाताई जाधव, कैलास पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

 

follow us