Download App

भव्य मंडप अन् नेतेमंडळीची धावपळ; आझाद मैदानावर शपथविधीची जोरदार तयारी सुरू

Mahayuti Goverment Oath Ceremony Preparation At Azad Maidan : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालंय. त्यामुळं आता पुन्हा महायुतीच सरकार स्थापन करणार हे स्पष्ट झालंय. दरम्यान महाराष्ट्राच्या नव्या सरकारच्या (Mahayuti Goverment) शपथविधीसाठी 5 डिसेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. हा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) पार पडणार आहे. शपथविधी सोहळा 5 तारखेला संध्याकाळी होणार आहे. मात्र, नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण असेल? हे अजून देखील गुलदस्त्यातच आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

मोठी बातमी! बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरीच्या बहिणीला अमेरिकेत अटक, नक्की काय आहे प्रकरण?

महायुतीने नव्या सरकारच्या शपथविधीसाठी जय्यत तयारी केलेली आहे. धनंजय मुंडे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह प्रमुख नेत्यांची(BJP Leader) सोहळ्याच्या तयारीसाठी धावाधाव सुरू असल्याचं समोर येतंय. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीची जोरदार तयारी आझाद मैदानावर सुरू असून यासाठी भव्य मंडप उभारण्याचं काम देखील सुरू आहे.

भाजपकडून सत्तेची खेळी, दाल में कुछ काला है… अंजली दमनिया यांचा गंभीर आरोप

महाराष्ट्र भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदाची निवड 4 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता होणार असल्याची माहिती मिळतेय. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवणार आहेत. भाजपच्या ज्या नवनिर्वाचित आमदारांची नवे नेते म्हणून निवड केली जाईल, ते सर्व 5 डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानात शपथ घेणार आहेत. भाजपने अजून राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्‍यांचे नाव घोषित केलेले नाही. राज्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असतील, असा तर्क बांधला जातोय.

सरकार स्थापनेच्या चर्चांदरम्यान एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. एकनाथ शिंदे दोन दिवस त्यांच्या दरे गावी होती. त्यानंतर ते काल ठाण्यात परतले आहेत. अजित पवार आणि एकनाथ शिंदे शपथविधीपूर्वी कॅबिनेट खात्यावर चर्चा करणार असल्याचं देखील समोर येतंय. शपथविधी सोहळ्याला केवळ दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे किती मंत्री शपथ घेतील हे थेट 5 तारखेलाच स्पष्ट होईल. एकनाथ शिंदे यांच्याकडून गृहखात्यावर दावा केला जातोय, त्यामुळे गृहखात्यावर कोणाची वर्णी लागते हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.

 

follow us